बहुजननामा ऑनलाईन टीम : बऱ्याच वेळा आपल्या मोबाईल नंबर कंपनीची नेटवर्क समस्या असल्या कारणाने आपण आपला क्रमांक अन्य कंपनीमध्ये पोर्ट करण्याचा विचार करतो. मात्र त्या कालावधीस खूप वेळ लागत असल्याने आपली बरीच कामी रखडली जातात. मात्र आता, मोबाइल नंबर पोर्ट करणे आणखी सोपं झालं आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच (TRAI)ने मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी संदर्भात नवी नियम लागू केले असून, त्या अंतर्गत आता ग्राहक ३ दिवसांत आपला नंबर पोर्ट करू शकतील. हे नियम १६ डिसेंबरपासून लागू होणार आहेत.
मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी म्हणजे काय ?
जर तुम्हाला एका मोबाइल कंपनीची सेवा बदलून दुसऱ्या मोबाइल कंपनीची सेवा घ्यायची असेल तर मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीचा उपयोग होतो. जरी कंपनी बदलली तरी तुमचा मोबाइल नंबर राहतो. सध्या नंबर पोर्ट करण्यासाठी ७ दिवसांचा अवधी लागत होता. आता या नवीन नियमांमुळे हाच अवधी ३ दिवसांचा असेल. मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीमध्ये यूजरला पोर्टिंग कोड जनरेट करावा लागतो. ज्या यूनिक कोडमुळे नंबर पोर्ट करता येतो.
ऑपरेटर्सना मिळणार फायदा :
टेलिकॉम ऑपरेटर्सना मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी ट्रॅन्जॅक्शन साठी पैसे भरावे लागतात. सध्या प्रत्येक ग्राहकासाठी टेलिकॉम ऑपरेटरला १९ रुपये द्यावे लागतात. मात्र ट्रायच्या नव्या नियमानुसार आता टेलिकॉम ऑपरेटर्सना ५.७४ रुपये भरावे लागणार आहे.
Visit : bahujannama.com