मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोहिनूर मिल प्रकरणी नुकतीच ई़डीकडून चौकशी करण्यात आली. यानंतर आता मनसैनिक सरकारविरोधात आक्रमक होताना दिसत आहे. मसनेचे कार्यकर्ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून निशाणा साधताना दिसत आहेत. सोशल मीडियावर यासंबंधी फोटो स्वरुपातील मजकूर शेअर केला जाताना दिसत आहे.
मनसेने भाजप-शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मनसेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, परिवहन मंत्री दीवाकर रावते, सार्वजनिक बांधकाम आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप सोशल मीडियवारून केले आहेत. महाराष्ट्राचे आरोपी या टॅगलाईनसह मसनेने सरकारवर हल्ला चढवला आहे.
https://www.facebook.com/rajsarkamns/photos/a.140897232747537/1033079596862625/?type=3&theater
https://www.facebook.com/rajsarkamns/photos/a.140897232747537/1033079693529282/?type=3&theater
https://www.facebook.com/rajsarkamns/photos/a.140897232747537/1033079820195936/?type=3&theater
https://www.facebook.com/rajsarkamns/photos/a.140897232747537/1033079373529314/?type=3&theater
मनसेने पोस्टमध्ये जे फोटो शेअर केले आहेत त्यात प्रत्येक खात्याचा मंत्री, त्याचा फोटो आणि त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचा आरोप अशा आशयाचा मजकूर आहे. मनसेकडून असे अनेक फोटो व्हायरल केले जात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे अधिक आक्रमक होत सरकारची गोची करणार असल्याचं दिसत आहे.