MNS Sandeep Deshpande | ‘व्यापारी आहात, बाप बनायचा प्रयत्न करु नका’; मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुशील केडियाला सुनावले

Sandip Deshpande | 'How to move Mira Road march to Ghodbunder? It shows the strength of Marathi people.': MNS challenges Chief Minister

मुंबई :  MNS Sandeep Deshpande | ‘आमच्याकडे मराठी नव्हे हिंदीच चालते’, अशी टिप्पणी केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेल्या व्यापाऱ्याच्या भाईबांधवांनी गुरुवारी मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढून मनसेचा निषेध केला होता. या वेळी मीरा-भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे मनसेपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. मनसे नेते संदीप देशपांडे देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

सोशल मीडियावर अनेक अमराठी लोकांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेला लक्ष्य करण्यात आले. सुशील केडिया नावाच्या एका युजरने राज ठाकरे यांना ललकारले होते. ‘राज ठाकरे ड्रामा बंद कर. तुझे दहा- बारा गुंड दोन-चार कानाखाली मारतील. पण आम्ही आमरण उपोषणाला बसलो, तर तुला हात जोडून माफी मारावी लागेल. मग काय करशील’, असे या सुशील केडियाने म्हटले होते. हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे मुंबईत राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळते.

”बेपारी आहात बेपार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल. तर कानाखालीच बसेल, बाकी मेहता बिहता नी चड्डीत राहायचं. तूर्तास एवढंच,” असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.