MNS On Shivsena | वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो, शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्याने मनसेची टीका

Uddhav Thackeray | mns raj thackeray on konkan visit slams uddhav thackeray shivsena

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – MNS On Shivsena | मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation) दणका देत मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) मेळावा घेण्यास परवानगी दिल्याने सध्या शिवसैनिकांमध्ये (Shiv Sainik) आनंदाचे वातावरण आहे. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर शिवसेनेने जल्लोष साजरा केला. मात्र, विरोधकांनी या जल्लोषावर सुद्धा टीका करण्यास सुरूवात केली आहे. शिंदे गटाने (Shinde Group) शिवसेनेवर टीका केल्यानंतर आता मनसेने सुद्धा शिवसेनेवर टीका (MNS On Shivsena) केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

हायकोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली. ठाकरे यांनी म्हटले, कार्यकर्त्यांनी वाजत-गाजत यावे. परंतु दसरा मेळाव्याला गालबोट लागेल असे वागू नये.

 

दरम्यान, शिंदे गट आणि भाजपाने (BJP) शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर परवानगी मिळू नये यासाठी सत्तेचा वापर करत सर्व प्रयत्न केले. मात्र, कोर्टाने महापालिकेला फटकारल्याने शिंदे-फडणवीसांसह शिवसेनेच्या सर्वच विरोधकांना चपराक बसली आहे. (MNS On Shivsena)

 

शिवसेनेला मिळालेल्या परवानगीनंतर शिंदे गट, भाजपाने टीका करण्यास सुरूवात केली.
आता मनसेने सुद्धा टीका केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande)
यांनी केलेल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
यात म्हटले आहे की, वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो.
यापूर्वी राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) वारसा विचारांचा असतो म्हणत उद्धव ठाकरेंवर घणाघात केला होता.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावताना म्हटले होते की,
दसरा मेळावा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) सुरू केला त्यांची टॅगलाईन होती
हिंदुत्ववादी विचारांचे सोने लुटण्यासाठी या, आता ज्यांना परवानगी मिळाली त्याठिकाणी हिंदुत्ववादी विचार ऐकायला
मिळणार नाहीत. तर टोमणे ऐकायला मिळतील. गद्दार, वज्रमूठ, खोके, बेईमानी हेच शब्द असतील.
ही टोमणे सभा असेल आणि खरे हिंदुत्ववादी विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सभेत
ऐकायला मिळतील.

 

 

Web Title :-  MNS On Shivsena | heritage is not of the field but of thought mns targeted shivsena uddhav thackeray by sandeep deshpande

 

हे देखील वाचा :

BJP Leader Vinod Arya | ज्येष्ठ भाजपा नेते विनोद आर्या यांच्या मुलाच्या रिसोर्टमधून बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह सापडला, विनयभंग झाला असल्याचा वडिलांकडून आरोप

Devendra Fadnavis | एकनाथ खडसेंची घरवापसी होणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात सांगितलं… (व्हिडिओ)

Eknath Shinde Group Vs Shivsena Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा नाही तर टोमणे सभा, शिवाजी पार्कवर शिवसेनेला परवानगी मिळाल्याने नाराज शिंदे गटाने उडवली खिल्ली