मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – MNS On Dhananjay Munde | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्यावर टीका करताना त्यांना अर्धवटराव असं म्हटलं होतं. धनंजय मुंडेंच्या टीकेला मनसेकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मनसे चित्रपटसेनेचे प्रमुख अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी याबाबत ट्विट केलं आहे. (MNS On Dhananjay Munde)
अहो धनंजय मुंडेराव, तुम्ही ज्यांची ‘अर्धवटराव’ म्हणून खिल्ली उडवताय, ते राजसाहेब तुमच्यासारख्या ‘तात्या विंचू’ चा ओम फट स्वाहा करणार आहेत, असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच राजसाहेबांनी दे दणादण करायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे, लवकरच तुमचा थरथराट होणार, Get Well Soon धनंजय मुंडे, असंही खोपकर म्हणाले आहेत.
धनंजय मुंडे काय म्हणाले होते ?
पूर्वी रामदास पाध्ये (Ramdas Padhye) यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या (BJP) बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरु आहे. अशाच प्रकारे रामदास पाध्येच्या तोंडून एक अर्धवटराव बोलत असल्याचं म्हणत धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंवर टीका केली होती. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
दरम्यान, राज्यात भोंग्यांच्या मुद्द्यांवरून आधीच राजकारण तापलेलं असताना आता राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये शाब्दिक टोलेबाजी पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांची 1 मे ला औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा आहे त्या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Web Title :- MNS On Dhananjay Munde | mns amey khopkar tweet after ncp dhananjay munde criticise raj thackeray in sangli
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Stomach Bloating Problem | जेवल्यानंतर तुमचं पोट फुगतं?; मग ‘हे’ पदार्थ खाणे टाळा; जाणून घ्या
Kidney Cure | किडनी डिटॉक्स करतात ‘हे’ 3 ड्रिंक, जाणून घ्या बनवण्याची पद्धत