मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मनसेच्या अधिवेशनाला सुरुवात झाल्यावर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीन भगवा रंग असलेल्या झेंड्याचे अनावरण केले. त्यावर राजमुद्रा देखील वापरण्यात आली असून सोबत मनसेच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली आहे. यामुळे मनसे येत्या काळात हिंदुत्वाकडे वाटचाल करेल, असे चित्र दिसत आहे.
"घुसखोरांना देशाबाहेर हाकला, अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेला दणका, शून्य कचरा मोहीम राबविण्यात येईल." – सरचिटणीस श्री. किशोर शिंदे #मनसे_अधिवेशन #शहर_नियोजन_ठराव
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) January 23, 2020
मनसे नेत्यांचा ठराव… महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी अमित ठाकरे ह्यांची नियुक्ती. समस्त महाराष्ट्र सैनिकांचं अनुमोदन. #मनसे_अधिवेशन pic.twitter.com/ej2p6bqZfO
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) January 23, 2020
"महाराष्ट्रात येणारे लोंढे थोपविण्यासाठी महाराष्ट्राला विशेष दर्जा द्या. महाराष्ट्रातील स्थानिक भूमिपुत्रांना प्रामुख्याने प्राधान्य दिलं गेलंच पाहिजे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे." – @JPBaviskarMNS #मराठी_महाराष्ट्र #मनसे_अधिवेशन

या अधिवेशनासाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते येणार असून अधिवेशन स्थळी चहापान आणि भोजनाची सोय केली आहे. महाविकास आघाडीमुळे शिवसेनेला आक्रमक हिंदुत्वाची भूमिका अडचणीची ठरणार असल्याचा दावा केला जात आहे.
मनसेचे सरचिटणीस किशोर शिंदे यांनी दुसऱ्या सत्राची सुरुवात केली. त्यात त्यांनी शहर व नियोजन याबद्दल ठराव मांडला. तसेच घुसखोरांना देशाबाहेर हाकला, अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यवस्थेला दणका देण्याची मोहीम राबविण्यात येईल, असाही ठराव त्यांनी मांडला असून अप्रत्यक्षपणे एनआरसीला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
Visit : bahujannama.com