मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईत मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.पण यानिमित्ताने राज्यातील तमाम मराठी प्रेमी शिवसैनिकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न मनसेकडून करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मनसेच्या नेत्यांनी शिवसैनिकांना साद घातली आहे. बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका, मनसेचा झेंडा हाती घ्या, असं आवाहन करण्यात आलं आहे.
बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन’से सामील व्हा !
मनसे चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. ट्विटच्या माध्यमातून खोपकर यांनी महाविकास आघाडीवर तोफ डागली आहे. या आघाडीला त्यांनी ‘सपक महाखिचडी’ची उपमा दिली आहे. पोषक आहारासाठी राब राब राबलेल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला सपक महाखिचडी आली आहे. पण सच्च्या कार्यकर्त्यांनो, बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका… असा धीर ट्विटमधून देण्यात आला आहे. ‘निर्लज्जपणे असाच सुरू राहील सत्तेचा खेळ… मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ…’ बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन’से सामील व्हा, असं आवाहन ट्विटमधून करण्यात आलं आहे.
पोषक आहारासाठी राब राब राबलेल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला आली सपक महाखिचडी..
पण सच्च्या कार्यकर्त्यांनो,बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका…
निर्लज्जपणे असाच सुरु राहील सत्तेचा खेळ
मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ
बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 22, 2020
राज्यात विधानसभा निवडणूका झाल्यापासून राजकीय समीकरण बदलली आणि शिवसेनेने भाजपाची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यात सत्ता स्थापन केली. राजकीय अपरिहार्यता बघता आता शिवसेनेला हिंदुत्व व मराठीची भूमिका जोरकसपणे मांडता येणार नाही. त्यामुळं शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता असल्याचं बोललं जातं. त्याचाच फायदा उचलून पक्षाला उभारी देण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे. मुंबईतील गोरेगाव इथं मनसेचा महत्त्वाचा मेळावा होणार आहे. यात राज ठाकरे पक्षाची नवी भूमिका जाहीर करणार आहेत. मनसेचा नवा ध्वजही या मेळाव्यातून पुढं आणला जाणार आहे. या साऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर खोपकर यांनी केलेलं ट्विट महत्त्वाचं मानलं जात आहे.
Visit : bahujannama.com