नवी मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षाच्या पनवेल आणि उरण तालुका महिला आघाडी जिल्हाध्यक्षा आदिती सोनार (Aditi Sonar) यांनी एक अजब गुन्हा केला आहे. सोनार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सहीचा आणि शिक्क्यांचा वापर करून अवैध बांधकाम केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्यावर खांदेश्वर पोलीस ठाण्यात पनवेल तहसील कार्यालयातर्फे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (MNS)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आदिती सोनार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या केल्या. तसेच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा बनावट शिक्का तयार केला. त्यांच्या वापरातून त्यांनी अवैध बांधकामांना परवानगी दिली आणि ती पूर्ण केली. याबाबत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. खांदेश्वर पोलिसांनी त्यांच्यावर फसवणूक आणि इतर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीसांना प्राप्त माहितीनुसार, आदिती सोनार यांनी काही दिवसांपूर्वी पनवेलच्या विहीघर परिसरातील शेतजमिनीवर बांधकाम केले होते. यासाठी त्यांनी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या खोट्या सहीचा आणि शिक्यांचा वापर केला होता. तसेच याशिवाय त्यांनी शेतजमीन बिगरशेती असल्याचे देखील भासवले होते. (MNS)
यासंदर्भात रायगड जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार प्राप्त झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी केली असता,
आदिती सोनार यांनी बनावट सही आणि शिक्क्यांचा वापर केल्याचे उघड झाले.
याप्रकरणी रायगडच्या खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे प्रकरण उघड होताच परिसरात खळबळ उडाली आहे.
अदिती सोनार यांनी वर्षभरापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला होता.
मनसे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- MNS | khandeshwar police register fir against mns aditi sonar over forged stamps in the name of collector
हे देखील वाचा :
IPL 2023 | राजस्थान रॉयल्सने अब्दुल बसिथसाठी खर्च केले 20 लाख; कोण आहे अब्दुल बसिथ?
Jaykumar Gore Accident | जयकुमार गोरे यांचा अपघात की घातपात; वडील भगवान गोरे यांच्या विधानाने खळबळ