MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन ‘अॅक्शन मोड’वर, अखेर ‘ते’ अनधिकृत बांधकाम हटवले
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – MNS Chief Raj Thackeray | मुंबई शहरातील माहिम मजार (Mumbai Mahim Mazar) परिसरात झालेल्या कथीत अनधिकृत बांधकामावर (Unauthorized Construction) मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी शिवाजी पार्क येथील गुढी पाडवा मेळाव्यात (MNS Padwa Melava) केलेल्या भाषणात माहिम मजार येथे अनधिकृत बांधकाम केल्याचा दावा केला होता. त्यानंतर अवघ्या काहीच तासातच मुंबई महापालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) कारवाई करत हे बांधकाम हटवण्यात आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गुढी पाढवा मेळाव्यात माहिमच्या सुमुद्रात झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी व्हिडिओ दाखवला होता. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेल्या दोन वर्षात समुद्रात कथित मजार उभारण्यात आली. त्याठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आले असा दावा राज ठाकरे यांनी केला होता. जर महिनाभरात या जागेवर कारवाई झाली नाही तर त्याच्या शेजारी सर्वात मोठे गणपती मंदिर बांधू असा इशारा राज ठाकरे यांनी प्रशासनाला दिला होता.
Maharashtra | Demolition drive started at the encroached site of 'Dargah' amid heavy police deployment at Mahim beach in Mumbai after MNS chief Raj Thackeray yesterday alleged that a Dargah is being built here illegally. pic.twitter.com/G0yx2c2Wq2
— ANI (@ANI) March 23, 2023
राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर रातोरात प्रशासकीय चक्रे वेगाने फिरली. याठिकाणची जागा महापालिकेने नाही तर मुंबई जिल्हाधिकाऱ्यांच्या (Mumbai District Collector) अख्यारित असल्याने ही कारवाई त्यांच्याकडून केली जाईल असं मनपाने सांगितले. गुरुवारी सकाळी संबंधित यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्याठिकाणी जागेचे मॅपिंग करण्यात आले. त्यानंतर या जागेचे कुठे नोंद आहे का याची पडताळणी करण्यात आली. परंतु ही मजार 600 वर्ष जुनी असल्याची नोंद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाल्याचे आढळून आले.
https://www.instagram.com/p/CqHv6uXj-xj/?utm_source=ig_web_copy_link
येणाऱ्या काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने तात्काळ अनधिकृत बांधकामावर
हातोडा मारला. तसेच जेसीबीने सर्व बेकायदेशीर बांधकाम हटवले. संपूर्ण जागा ही पूर्ववत करण्यात आली आहे.
रात्री उशिरा सभा संपल्यानंतर काही जणांनी त्याठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याठिकाणी
बंदोबस्त ठेऊन तिथे कोणालाही जाऊ दिले नाही. सकाळी साडेसातच्या सुमारास प्रशासनाने मनुष्यबळ वापरून याठिकाणी अनधिकृत बांधकामावर हातोडा मारला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मनसेकडून प्रशासनाचे कौतुक
अनधिकृत बांधकामावर प्रशासनाने कारवाई केल्यानंतर मनसेने प्रशासनाचे कौतुक केले आहे.
मनसे नेत्यांनी याबाबत प्रशासनाला कळवल्यानंतर याची तातडीने दखल घेतल्याबद्दल मनसेने प्रशासनाचे कौतुक
केले आहे. तसेच इतर ठिकाणीही अशी बांधकामे होत असतील तर त्यावर कारवाई करण्यात यावी.
तसेच त्या जागेवर पुन्हा बांधकाम होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी,
असे मनसे नेते नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी म्हटले आहे.
Web Title :- MNS Chief Raj Thackeray | after the warning of mns president raj thackeray mahims unauthorized construction on that site was promptly removed
हे देखील वाचा :
Pune Crime News | रूम भाड्याने देताय सावधान; डिपॉझिट पाठविण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक
Comments are closed.