मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राजकीय क्षेत्रातील व्यक्तींपर्यंतही कोरोनाचा प्रादुर्भाव पोहोचला आहे. ठाकरे सरकारमधील तिसर्या मंत्र्यांलाही कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांपैकी तीन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्रा, कोरोनाची बाधा झालेल्या सुरक्षा रक्षकांनी लढाई जिंकली आहे.
राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यातील तीन पोलिस कर्मचार्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या तिन्ही पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. हे तीन पोलीस कर्मचारी उपचारानंतर बरे होऊन आता कोरोनामुक्त झाले आहेत. राज ठाकरे यांचा 14 जून रोजी वाढदिवस असतो. पण कोरोनाच्या परिस्थतीमुळे यंदा वाढदिवस साजरा करणे अजिबात उचित नाही, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्यायला येऊ नये, असा आदेश दिला आहे. त्याऐवजी आहे तिथेच जनतेला मदत करा, अशा सूचना देणारे जाहीर पत्रच कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिले आहे.