ठाणे : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तब्बल १०० पैकी केवळ एका जागी खाते उघडण्यात यश मिळाले आहे.कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेचे प्रमोद पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा ५ हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे प्रमोद यांच्यामुळे मनसेला पहिला आमदार मिळाला आहे.
दरम्यान मनसेने आपले १०० उमेदवार मैदानात उतरवत राज्यात भक्कम विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निवडून देण्याचं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक सभेत केलं होत. मात्र विरोधी पक्षात येण्या इतपत जागांवर मनसेला विजय मिळू शकला नाही. त्यामुळे राज ठाकरे यांचे स्वप्न कार्ड फेल गेले आहे. दरम्यान मतमोजणीच्या २५ व्या फेरीपर्यंत मनसे शून्य आकड्यांवर होती. मात्र यानंतर २८ व्या फेरीला प्रमोद पाटील यांनी ५ हजार मताधिक्याने जोरदार मुसंडी मारली होती. प्रमोद पाटील यांना ८६,२३३, तर रमेश म्हात्रे यांना ८०, ६६५ मते मिळाली. यानंतर तर वंचित बहुजन आघाडीचे अमोल केंद्रे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
कल्याण विधानसभा मतदारसंघ
1. प्रमोद उर्फ राजू रतन पाटील (मनसे) – 97927 विजयी झालेले उमेदवार
2. रमेश म्हात्रे (शिवसेना) – 86773
3. अमोल धनराज केंद्रे (वंचित बहुजन आघाडी) -6199
4. चंद्रकांत विठ्ठल सोनवणे ( बहुजन मुक्ती पार्टी) – 458
5. सुरेश राम पंडागळे (बहुजन विकास आघाडी) – 528
6. रोशन हरिश्चंद्र पाटील – 665
7. सुधाकर ओमप्रकाश तपलीयाल -365
8. कृष्णकांत चंद्रकांत रणपीसे (अपक्ष) – 229
9. झुंबर जाधव (अपक्ष) – 183
10. विनय विश्वनाथ पाटील (अपक्ष) – 440
11. राकेश काठोड पाटील (अपक्ष) – 899
12. शिवा कृष्णमूर्ती अय्यर (अपक्ष) -1156
13. नोटा – 6092
टीप – मतदानाची आकडेवारी ही निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीवरून देण्यात आली आहे.
Visit : bahujannama.com