गुवाहाटी : वृत्तसंस्था – विधान परिषदेच्या निकालानंतर (Legislative Council Results) शिवसेनेत (Shivsena) मोठ्या प्रमाणात बंडाळी उफाळून आली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि समर्थक आमदारांनी काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीसोबत (NCP) सरकार नको अशी रोखठोख भूमिका घेत थेट पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Party Chief Uddhav Thackeray) यांना आव्हान दिले. त्यात बंडखोर आमदारांचा गट भाजपमध्ये (BJP) सहभागी होणार का? असा प्रश्न शिवसैनिक विचारु लागले आहेत. याच दरम्यान शिंदे गटातील आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांनी ट्विट करुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांनी आपण शिवसैनिक असून कुठल्याही परिस्थितीत भाजपमध्ये जाणार नसल्याचे सांगितले.
आमदार योगेश (MLA Yogesh Kadam) कदम यांनी ट्विट करत शिवसैनिकांना आवाहन केले आहे.
योगेश कदम ट्विटमध्ये म्हणतात की, सप्रेम जय महाराष्ट्र, मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..! भाजपमध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही. मुळात तशी गरज ही पडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठी उचललेले हे पाऊल, येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सप्रेम जय महाराष्ट्र,
मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..!
भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही.. मुळात तशी गरज ही पडणार नाही..
रा. काँ. पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठी उचललेले हे पाऊल येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल..— Yogesh Ramdas Kadam (@iYogeshRKadam) June 24, 2022
दुसऱ्या ट्विटमध्ये आमदार कमद यांनी म्हटले की, ही परिस्थिती मावळल्यावर दापोली मतदारसंघात (Dapoli Constituency) शिवसेनेचा भगवाच हातात घेऊन येईल.
संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका. मी शिवसैनिक! अशा प्रकारे योगेश कदम यांनी आवाहन केले आहे.
त्यामुळे शिंदे गट भाजपात सहभागी होणार नाही असा दावा करण्यात येत आहे.
Web Title :- MLA Yogesh Kadam | i will not join bjp i am a shiv sainik shinde groups mla yogesh kadams tweet