MLA Sanjay Shirsat | संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट यांची जीभ घसरली, म्हणाले…

MLA Sanjay Shirsat | shinde group mla sanjay shirsats controversial criticism of sanjay raut

छत्रपती संभाजीनगर : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रविवारी मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray Group MP Sanjay Raut) यांनी टीका केली होती. या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांची जीभ घसरली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय म्हणाले संजय राऊत?

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली तर मग मी काय बोलणार? सदू आणि मधु भेटले. बालभारतीत धडा होता आम्हाला सदू आणि मधू भेटल्याचा तसे भेटले असतील. ते जुने असतील किंवा नव्याने प्रेम उफाळून आलं असेल. मालेगावात जी विराट सभा झाली त्यानंतर त्यांच्या भावना उचंबळून आल्या असतील एकमेकांचे अश्रू पुसायला भेटले असतील. आम्ही काय करणार? आम्ही आमचं काम करतोय असं संजय राऊत म्हणाले.

 

काय म्हणाले संजय शिरसाट?

संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांना भेटले त्यात काय वाईट आहे. शिंदे एका ठाकरेला भेटले म्हणून दुसरे ठाकरे नाराज का होतात? राज ठाकरे यांच्याकडे व्हिजन आहे, एखाद्या व्यक्तीचा चांगला गुण घेतला तर त्यात वाईट काय आहे? दुसऱ्याला भेटल्यानंतर त्यांच्या पोटात पोटसूळ उठतो अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.

 

सकाळी उठायचं आणि…

शिरसाट पुढे म्हणाले, मी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) भेटण्यासाठी घेऊन जातो. त्यांची भेटण्याची तयारी आहे का? राज ठाकरे तुमच्यासारखे नाहीत, सकाळी उठायचं आणि कुत्र्यासारखं भो-भो भुकायचं. राज ठाकरे एकदाच बोलतात पण सगळ्यांची हवा टाईट होऊन जाते. संजय राऊत मूर्खाच्या नंदनवनात वावरणारे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं शिरसाट म्हणाले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title : MLA Sanjay Shirsat | shinde group mla sanjay shirsats controversial criticism of sanjay raut

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | जनमित्रांना मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना तत्काळ अटक; थकबाकीमुळे वीजपुरवठा केला होता खंडित

Maharashtra Police – DG Medals | DG संजय कुमार यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह विजेत्या डीसीपी स्मार्तना पाटील, एसीपी बजरंग देसाई, रूक्मीणी गलांडे, निवृत्त एसीपी प्रतिभा जोशी, लक्ष्मण बोराटे, व.पो.नि. प्रताप मानकर, वैशाली चांदगुडे यांच्यासह इतर अधिकारी व अंमलदारांचा गौरव (Video)

Johnson Charles | वेस्ट इंडिजच्या जॉन्सन चार्ल्सने वेगवान शतक झळकावत ख्रिस गेलचा मोडला ‘तो’ विक्रम

Maharashtra Governor Ramesh Bais | दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नको; सहकार्य मिळणे गरजेचे – राज्यपाल रमेश बैस

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची खुर्ची धोक्यात, न्यायालय मुख्यमंत्रीपद काढून घेऊ शकते? जाणून घ्या सविस्तर