मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – MLA Manisha Kayande | शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनापूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठे धक्के बसताना दिसत आहेत. नुकतेच शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा (Shishir Shinde Resignation) दिला आहे. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे (MLA Manisha Kayande) शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यापासून ठाकरे गटाला धक्का बसताना दिसत आहे. ठाकरे यांच्या महाशिबिराच्या दिवशी आमदार मनीषा कायंदे यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे मनीषा कायंदे शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार का, याबाबत चर्चाना उधाण आले आहे.
कोण आहेत मनिषा कायंदे?
मनिषा कायंदे (ठाकरे गट) या विधानपरिषदेच्या आमदार आहेत.
भाजपकडून 2009 ला सायन कोळीवाड्यातून निवडणूक लढल्या होत्या . त्यानंतर 2012 साली त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. 2018 साली त्यांना ठाकरेंनी विधानपरिषदेची जबाबदारी दिली होती. आता आमदार कायंदे या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
Web Title : MLA Manisha Kayande | mla-manisha-kayande-to-join-shinde-shiv-sena-soon-uddhav-thackeray-shivsena-anniversary-not-reachable
- Pune Bibvewadi Fire News | पुणे : बिबवेवाडी परिसरात गोदामांना भीषण आग; मंडप साहित्याच्या गोदामासह 20 गोदाम अग्नीच्या भक्ष्यस्थानी*
- Chandrakant Patil – Pune Police | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्तालय येथे आढावा बैठक
- ACB Trap News | सावकारी लायसन्सच्या कामासाठी 50 हजार रुपये लाच मागणारा वेल्हे सहाय्यक निबंधक कार्यालयातील लिपीक एसीबीच्या जाळ्यात
- Maharashtra Police Inspector Transfers (Pune) | पुण्यातील 12 पोलिस निरीक्षकांच्या आयुक्तालयाबाहेर बदल्या, 34 पोलिस निरीक्षकांची राज्यभरातून पुण्यात ट्रान्सफर