बहुजननामा ऑनलाईन टीम – सवर्च पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अप्रत्यक्ष प्रचाराला सत्ताधारी आणि विरोधकांनी सुरुवातही केली आहे. आपापल्या मतदार संघात जाऊन लोकांशी संवाद साधण्यासही सुरुवात केली आहे. त्यासाठी भरीत बहुजन महासंघाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांनी बाळापूर येथे सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा याच मतदार संघात बाजी मारत हॅट्रीक करण्यासाठी ते पूर्णपणे प्रयत्न करत आहेत.
अकोला जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत ५ पैकी ४ विधानसभा मतदार संघात भाजपाला यश मिळाले होते. तेव्हा भाजपच्या प्रवाहातही बाळापुर मतदारसंघात बळीराम यांचा विजय झाला होता. तेव्हा ही ते या मतदार संघातील सलग दुसऱ्यांदा आमदार झाले होते. तर आता युती आणि आघाडी या मतदार संघात आपला झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
हा मतदारसंघ भाजपच्या वाट्यात असून ही शिवसेनेकडून या मतदार संघात दावा केला जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्र्वादीतही हेच सुरु आहे. हा मतदार संघ काँग्रेसकडे असला तरी राष्ट्रवादीने येथे दावा केला आहे. पुन्हा सिरस्कारांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला तर त्यांना बळीराम मतदार संघात हॅट्रीक साधण्याची संधी आहे. दरम्यान भरीत बहुजन महासंघाचे विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांना बुलढाणा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र यावेळी त्यांचा पराभव झाला. म्हणून आता वंचित आघाडीकडून सिरस्कार यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी पक्की समजली जात आहे.