MLA Bachchu Kadu | आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा, काय आहे प्रकरण?

MLA Bachchu Kadu | mla bachu kadu has been sentenced to two years by the nashik and district sessions court know in detail

नाशिक : बहुजननामा ऑनलाईन  आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांना नाशिक व जिल्हा सत्र न्यायालयाने (Nashik District Sessions Court) दोन वर्षांची शिक्षा सुनावली (Sentenced) आहे. शासकीय कामात अडथळा आणि अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तणूक संदर्भात न्यायालयाने बच्चु कडूंना (MLA Bachchu Kadu) ही शिक्षा सुनावली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

दिव्यांग कल्याण निधी (Handicapped Welfare Fund) खर्च केला नाही या वादातून आमदार बच्चू कडू
(MLA Bachchu Kadu) यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा (Municipal Commissioner Abhishek Krishna) यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच शिवीगाळ केली होती. यावर पोलिसांनी हस्तक्षेप करुन पुढील घटना थांबवली आणि बच्चू कडू यांना ताब्यात घेतले होते. सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) याबाबत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. यानंतर आता कोर्टाने सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तणूक केल्या प्रकरणी शिक्षा सुनावली आहे.

 

नाशिक आयुक्तांवर हात उगारल्या प्रकरणी बच्चू कडू यांना दोन वेगवेगळ्या प्रकरणात ही दोन वर्षांची शिक्षा
झाली आहे. 2017 मध्ये नाशिक महापालिकेत अपंगांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरु होते.
पालिका आयुक्त यांना धमकावणे आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर होता.
तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आयपीसी 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

 

Web Title :   MLA Bachchu Kadu | mla bachu kadu has been sentenced to two years by the nashik and district sessions court know in detail

 

हे देखील वाचा :

Pune PMC Property Tax | ‘पुणेकरांची मिळकत करातील ४० टक्के सवलत कायम ठेवावी’ ! भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट

Pune PMC Recruitment | पुणे महापालिकेत 320 पदांची भरती, सरळसेवा पद्धतीने होणार भरती; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra BJP | भाजपमध्ये लवकरच मोठे बदल, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती; पुणे शहराध्यक्ष बदलणार?