मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – MLA Atul Bhatkhalkar | एमएमआरडीएने (MMRDA) मेट्रो स्टेशनबाबत केलेली कारवाई आणि मुंबईत कुरार मेट्रो स्टेशनच्या (Kurar metro station) कामाचा वाद चांगलाच रंगला आहे. कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी परिसरातील घरांवर आज (शनिवार) सकाळी पोलिसांकडून करवाई करण्यात आली. या कारवाईला स्थानिक नागरिकांनी विरोध केला. या कारवाई विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी आंदोलन करणारे भाजप आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी घरांची पाडापाड सुरु होती. या ठिकाणी पोहचून कारवाईला भातखळकर यांनी विरोध सुरु केला. कारवाईला विरोध करण्यासाठी आंदोलन करणारे भाजप आमदार अतुल भातखळकर यांना पोलिसांनी ताब्यात (arrest) घेतले. या प्रकरणी त्यांनी ट्विट करुन राज्य सरकारवर (state government) निशाणा साधला आहे. मला अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी ट्विट करुन दिली आहे.
ठाकरे सरकारच्या अत्याचाराचा कळस
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 17, 2021
ठाकरे सरकारच्या अत्याचाराचा कळस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उद्घाटनाच्या चमकोगिरीसाठी कुरारमधील मराठी माणसांची घरे MMRDA ने तेडली. लोकांना प्रचंड मारहाण केली. या विरोधात आवाज बुलंद केल्याबद्दल मला अटक करुन आरे पोलीस ठाण्यात नेत आहेत, असे अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
https://twitter.com/khadaksingh_/status/1416259686056136709?s=20
गिरगाव पॅटर्न का नाही
मराठी माणसाचे नाव घेऊन पक्षाचे दुकान चालवायचं आणि ज्या मेट्रो प्रकल्पात अडचणींचे डोंगर उभे केले, त्या प्रकल्पातील एका स्थानकाच्या उद्घाटनासाठी लोकांना उध्वस्त करायचे. त्यांचे आहे तिथे पुनर्वसन का नाही ? गिरगाव पॅटर्न का नाही, असा सवाल भतखळकर यांनी केला आहे.
#BIGNEWS kurar
मुंबई मेट्रो स्टेशनसाठी पोलीस कारवाई वादात
कुरार – पोलीस कारवाईला विरोध करणाऱ्यांना मारहाण
पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याची स्थानिकांची तक्रार#Jaimaharashtranews #Marathinews #Maharashtra #Mumbai #Metro #Kurar #beatings #complain— Jai Maharashtra News (@JaiMaharashtraN) July 17, 2021
कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करणार
भातखळकर यांनी ट्विटद्वारे सरकारवर हल्ला चढवला आहे. कुरारची कारवाई, ठाकरे सरकारचा अत्याचारी चेहरा दाखवणारी…. हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. तरीही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करुन तोडक कारवाई केली. आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करणार असल्याची माहिती भातखळकर यांनी दिली.
कुरारची कारवाई, ठाकरे सरकारचा अत्याचारी चेहरा दाखवणारी… हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. तरीही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करून तोडक कारवाई केली.
आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 17, 2021
ठाकरे सरकारची मोगलाई…
शुक्रवारी रात्री १२ वाजता नोटिसा देऊन आज सकाळी ९ च्या आधीच प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. भर पावसात कारवाई सुरू करण्यात आली. लोकांना मारहाण करत घराच्याबाहेर काढलं. आम्ही त्याला विरोध केला. त्यामुळे आम्हाला ताब्यात घेतलं.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 17, 2021
Web Titel :- mla atul bhatkhalkar arrested mumbai police aarey police station
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Today petrol price | एक दिवसाआड पेट्रोलच्या दरात वाढ !
Mumbai |DRI कडून लक्झरी कार ‘तस्करी’च्या रॅकेटचा केला ‘पर्दाफाश’
Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये