नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या चांद्रयान 2 मिशनबद्दल बोलायचे झाले तर अद्याप सर्व काही संपले असे अजिबात नाही. लँडर विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न इस्रोकडून सतत सुरू आहे. इस्रोच्या मते चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रमची तिरकी हार्ड लँडिंग झाली आहे. यानंतर विक्रम सुरक्षित आहे. विक्रमसोबत पुन्हा संपर्क करण्यासाठी इस्रोकडे फक्त 11 दिवस बाकी आहेत. विक्रमशी संपर्क साधण्यासाठी अमेरिकन स्पेस एजन्सी नासाची मदत घेण्याबाबतही विचार सुरू आहे. कारण नासाचं एक मिशन लूनर रिकॉनिसेंस ऑर्बिटर (Lunar Reconnaissance Orbiter) म्हणजेच LRO चांद्रयान 2 च्या तुलनेत चंद्राच्या जास्त जवळ चकरा मारत आहे. यामुळे चांगला डेटा मिळू शकतो.
तर विक्रमच्या ताज्या पोजिशनबद्दल समजू शकतं.
नासाच्या लूनर रिकॉनिसेंस ऑर्बिटरने चंद्राचे 3 डी फोटो घेतले आहेत. जर इस्रोने नासाच्या ऑर्बिटरच्या डेटाचा वापर केला तर विक्रमची ताज्या पोजिशनबद्दल समजू शकते. याआधीही LROच्या डेटाचा इस्रोने आंशिक रुपात लँडिंग स्पॉटवर वापर केला आहे. इस्रो सध्या ऑर्बिटरमधून चांगला डेटा मिळण्याची वाट पहात आहे. यानंतर एखादा निर्णय घेतला जाऊ शकतो.
कसा पुन्हा उभा राहू शकतो विक्रम ?
लँडर विक्रमच्या खालच्या बाजूला 5 थ्रस्टर्स आहेत ज्याच्या मदतीने त्याला चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करायची होती. लँडरच्या चारही बाजूला थ्रस्टर्स लावलेले आहेत. त्याला अंतराळातील प्रवासादरम्यान दिशा ठरवण्यासाठी ऑन केलं जातं. लँडरचा जो भाग झुकलेला आहे त्या भागातही हे थ्रस्टर्स आहेत. ऑर्बिटरद्वारे दाबल्या गेलेल्या भागाने (अँटीना) पृथ्वीवरील सेंड केलेली कमांड रिसीव्ह केली तर विक्रम पुन्हा एकदा उभा राहू शकतो. यानंतर इस्रोचं मिशन चंद्र पुन्हा सुरु होईल जे सध्या अडकलेलं आहे.
इस्रो सध्या फोटोंद्वारे मिळणाऱ्या डेटाची वाट पहात आहे. सध्या विक्रमवर सूर्यकिरणे नीट येत नाहीयेत. त्यामुळे त्याच्यावर सूर्यकिरणे पडण्याची वाट शास्त्रज्ञ पहात आहेत. कारण सूर्यकिरणांच्या प्रकाशात तो दिसावा. विक्रमचं किती नुकसान झालं आहे तेव्हा सहज दिसेल. यासाठी 2 ते 3 दिवस लागू शकतात. कारण हे चंद्राच्या ऑर्बिटवर अवलंबून असतं.
- तोंडामध्ये दिसणारे ‘हे’ ५ संकेत सांगतात, तुम्हाला कँसर तर नाही ना
- झोपण्याच्या अर्धा तासापूर्वी प्या खजूरचे दूध, होतील ‘हे’ ५ जबरदस्त फायदे
- ‘पॉप कॉर्न’ खाल्ले तर कधीही होणार नाहीत ‘हे’ आजार, ‘हे’ आहेत ८ फायदे
- ‘बेकिंग पावडर’ने मारु शकता घरातील सर्व झुरळ, वाचा ४ सोप्या पद्धती
- सावधान ! जीवघेणे आहे वायुप्रदूषण, होऊ शकतात अनेक आजार, असा करा बचाव
- १५ दिवस अगोदरच मिळतात ‘हार्ट फेल्युअर’चे ६ संकेत, दुर्लक्ष करू नका
- हार्ट अटॅक, कार्डियक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअरमधील फरक माहित आहे का ?
- अशी आहे सकाळी उठण्याची योग्य पद्धत, होतात ‘हे’ ४ फायदे
- रात्री झोपण्यापूर्वी खा फक्त २ ‘विलायची’, सकाळी पाहा याची ‘कमाल’
- झोपण्यापूर्वी प्या १ ग्लास ‘गरम पाणी’, जाणून घ्या होतात ‘हे’ ६ फायदे