ठाणे : बहुजननामा ऑनलाईन – BJP Kirit Somaiya |ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) गेल्या शंभर दिवसांपासून बेपत्ता असल्याचा भाजपाचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपाने ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. भाजप जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांनी ही तक्रार केली, किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) आणि अन्य 50 रहिवाशांनी मानवी साखळी करुन आंदोलन देखील केले. (Kirit Somaiya’s complaint to police that MLA Pratap Saranaik is missing)
ठाण्यातील वर्तकनगर येथे किरीट सोमय्या, (Kirit Somaiya) आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांनी पदाधिकाऱ्यांसोबत साखळी आंदोलन केलं. ओवळा माजिवडा मतदार क्षेत्रातील आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) हे गेले अनेक दिवस अज्ञातवासात आहेत. ते हरवल्याची तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) आले होते. तसेच, “प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) गायब असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं आहे. ते मातोश्रीमध्ये लपलेत असं बोलल जातय. म्हणून वर्तक नगरच्या मतदारांसह गायब आमदारांची तक्रार नोंदवण्यासाठी इथे आलो आहे. प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) मातोश्रीत असतील, तर त्यांना शोधून काढा” अशी मागणी देखील भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलीय.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन दरम्यान मिस्टर इंडिया’ (‘MR. India’) लिहिलेले बॅनर हाती धरले होते. आमदार प्रताप सरनाईकांना (Pratap Sarnaik) मिस्टर इंडिया’ ठरवून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. मागच्या शंभर दिवसांपासून प्रताप सरनाईक बेपत्ता असल्याचा भाजपाचा आरोप केला आहे. तसेच किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी वर्तकगर पोलीस ठाण्यात प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) बेपत्ता असल्याची तक्रार देखील नोंदवली आहे.
कृपया हे देखील वाचा:
जिओला जोरदार टक्कर देण्यासाठी एयरटेलने लाँच केला आकर्षक प्लॅन, मिळवा इतक्या महिन्यापर्यंत आता सर्वकाही ‘फ्री’
Pune Crime News | सायबर भामट्याकडून 36 वर्षीय महिलेची फसवणूक
Pune Crime News | हडपसर ते स्वारगेट प्रवासादरम्यान महिलेकडील दीड लाख लांबविले
Pune Crime News | अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या सराईताला विश्रामबाग पोलिसांकडून अटक