नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्या चेहऱ्यांना पाहून लोक तोंड फिरवतात त्यांच्यासोबत सौंदर्याच्या राणीने आनंदाने वेळ घालवला आणि त्यांच्यासोबत फोटोही काढले. आग्र्यात आलेली मिस युनिव्हर्स ग्रेट ब्रिटन एमा जेनकिंस हिने अॅसिड अटॅक पीडित मुलींसोबत संवाद साधला. तिने त्यांच्याशी संवाद तर साधलाच परंतु त्यांच्यासोबत फोटो सेशनही केलं. यावेळी एमा खूपच आनंदी दिसत होती.
एमाने सर्व अॅसिड अटॅक पीडितांच्या धैर्याचं कौतुक केलं. सोबतच त्यांनी एमाचं जे स्वागत केलं आणि तिला जो सन्मान दिला त्याबद्दल एमाने त्यांचे आभारही मानले.
मीडियाशी बोलताना एमा म्हणाली की, “अश घटनांना लगाम लावणं गरजेचं आहे. केवळ भारतच नाही तर जगभरातून अशा अनेक घटना समोर येताना दिसत आहेत. एका महिलेसाठी हा खूप अवघड काळ असतो.”
एमाने दिल्लीतील आणि आग्र्यातील प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करत लोकांना जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी आवाहन केलं.
अॅसिड अटॅक पीडितांची भेट घेतल्यानंतर एमाने ताजमहाल पाहिला. ताज पाहून तिला खूपच आनंद वाटला.
आपल्या आग्र्या दौऱ्याला घेऊन मिस युनिव्हर्स ग्रेट ब्रिटन एमा जेनकिंस खूपच उत्साही दिसली.