Minister’s In Maharashtra Govt | पुण्याला 3 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्री मिळण्याची शक्यता; ‘ही’ नावे चर्चेत

November 26, 2024

पुणे: Minister’s In Maharashtra Govt | विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) महायुतीला (Mahayuti) घवघवीत यश मिळालं. 132 जागा जिंकून भाजपा (BJP) सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. शिवसेना शिंदे (Shivsena Shinde Group) गटाला 57 तर अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान आता मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत राजकीय वर्तुळात हालचाली सुरु आहेत.

सुरुवातीच्या काळात भाजपा 10 आणि शिवसेना, राष्ट्रवादी अनुक्रमे 5-5 असा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळत आहे. मात्र असे असले तरी पुणे जिल्ह्यात 3 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदे मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.

यामध्ये चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), अजित पवार (Ajit Pawar) आणि दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) या तीन नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) या चार वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत तसेच खडकवासला येथून भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) हे देखील 4 वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे या दोघांपैकी एकाला आणि त्यांच्याबरोबर आमदार दत्तात्रय भरणेंना (Dattatray Bharne), शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.