मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सांगली कोल्हापूर परिसरात आलेल्या महापुरामुळे अनेक जणांचे जीव गेले. नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या सांगली कोल्हापुरातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले उद्या (दि. 12 ऑगस्ट) सांगली आणि कोल्हापूर दौरा करणार आहेत.
या दौऱ्यात सांगली कोल्हापूरातील पुरग्रस्तांना रामदास आठवले रिपब्लिकन पक्षातर्फे मदत देणार आहेत. राज्यातील रिपाइं कार्यकर्त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.
केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मुंबईतील सत्काराचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची अधिकृत घोषणा रामदास आठवले यांनी स्वतः जाहीर केली असून सांगली कोल्हापुरातील पूरग्रस्तांना रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.
उद्या सोमवारी सकाळी 9 वाजता हैद्राबाद मार्गे ना. रामदास आठवले हे कोल्हापुरात दाखल होणार आहेत. कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागाचा ते दौरा करणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 वाजता संगलीतील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. उद्या कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मदतीचे वाटप ना. रामदास आठवले करणार आहेत. राज्यभरातील रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन ना रामदास आठवले यांनी आज केले आहे.