बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : बॉलीवुड अॅक्टर सलमान खानच्या नावावर एका महिलेला फसवणुकीला बळी पडली आहे. राजस्थानच्या राहणार्या या महिलेचा दावा आहे की, तीन भामट्यांनी तिला 12 लाख रुपयांचा चुना लावला आहे, जे तिला अभिनेता सलमान खानच्या मालकीचा घोडा विकत होते.
महिलेने पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार, तिच्याकडून 11 लाख रुपये रोख आणि बाकी रक्कम चेकच्या माध्यमातून घेण्यात आली, परंतु कोणताही घोडा देण्यात आला नाही. महिलेने निष्पक्ष तपास करण्याची मागणी करत न्यायालयात धाव घेतली आहे. राजस्थान हायकोर्टाने गुरुवारी ही याचिका निकाली काढली.
राजस्थान हायकोर्टाने महिलेला संबंधित पोलीस उपायुक्तांकडे जाण्यास सांगितले. सोबतच पोलिसांना योग्य कारवाईचे निर्देश दिले. अभिनेता सलमान खान हॉर्स लव्हर म्हणून ओळखला जातो आणि त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक छायाचित्र शेयर केली आहेत.
आरोप आहे की निर्भय सिंह, राजप्रीत आणि अन्य एका व्यक्तीने कथित प्रकारे संतोष भाटी यांना आपल्या फार्महाऊसवर घोड्यासोबत अभिनेता सलमान खानचा फोटो दाखवला आणि सांगितले की, हा घोडा विक्रीसाठी उपलब्ध आहे. याचिकाकर्त्याचे वकील पी. डी. दवे यांनी आपल्या तक्रारीत उल्लेख केला.
संशयीतांनी भाटी यांना विश्वास दाखवला की, ते अभिनेत्याला ओळखतात आणि अगोदर सुद्धा त्याने आपले काही घोडे विकले आहेत. भाटी सुद्धा घोडा खरेदी करण्यासाठी तयार झाले आणि घोड्याची किंमत 12 लाख रुपये सांगण्यात आली, भाटी यांनी पैसे दिले, परंतु जेव्हा त्यांना त्याची डिलिव्हरी मिळाली नाही, तेव्हा त्यांनी मागच्यावर्षी ऑगस्टमध्ये पोलिसात तक्रार नोंदवली.
कथित प्रकारे त्यांच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यानंतर महिलेने जोधपुरमध्ये उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आणि पोलिसांकडून प्रकरणाचा निष्पक्ष आणि त्वरित तपास करण्याची मागणी केली.
सुनावणी दरम्यान, अॅडिशनल अॅडव्होकेट जनरल फरजंद अली यांनी सिंगल-जजच्या बेंच समोर बाजू मांडली की, पोलीस अगोदरपासूनच निष्पक्ष तपास करत होते. जस्टिस पीएस भाटी यांनी संबंधितांना पोलीस उपायुक्तांकडे जाण्यास सांगितले.