बहुजननामा ऑनलाईन टीम : पंजाबी सिंगर मिका सिंग (Mika Singh) सोशलवर कायमच अॅक्टीव असतो. त्यानं सयोनी सिनेमासाठी एक पप्पी हे गाणं लिहिलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, मोठ्या पडद्यावर रोमँटीक अॅक्शन सिनेमात गाणं पाहण्यासाठी उत्सुक आहे. परंतु त्याआधी त्यानं लॉकडाऊनमुळं झालेल्या त्रासाबद्दल सांगितलं आहे. त्यानं सांगितलं की गेल्या 8 महिन्यांपासून त्याच्याकडे काहीच काम नव्हतं.
मिका म्हणतो, मला माहित आहे. माझ्या सारखे खूप लोक असतील. परंतु मला खात्री आहे की, लवकरच सर्व काही ठिक होईल.
गाण्याबद्दल बोलताना मिका म्हणाला, सुरुवातीला निर्मात्यांनी त्याला जेव्हा या गाण्यासाठी संपर्क केला तेव्हा सुरुवातीला त्याला हे गाणं नव्हतं आवडलं. पंरतु जेव्हा त्यानं 3-4 वेळा गुणगुणलं तेव्हा त्याला हे गाणं खूप मजेदार वाटलं. यात काही डबल मिनिंग शब्दही आहेत असंही त्यानं सांगितलं.
नवीन संगीतकार अनंत आणि अमन यांनी हे गाणं रचलं आहे. मला वाटतं की, एकूण हे गाणं चांगल्या प्रकारे चित्रित करण्यात आलं आहे.
या सिनेमात तन्मय सिंह, मुस्कान सेठी, राहुल रॉय, योगराज सिंह, उपासना सिंह प्रमुख भूमिकेत आहेत. नितीन कुमार गुप्ता आणि सिंघल यांनी यात भूमिका साकारली आहे.