नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाला पाचवा वर्ल्ड कप जिंकून देणारा मायकल क्लार्क याने लग्नाच्या ७ वर्षानंतर आपली पत्नी काईली बोलडीपासून घटस्फोट घेतला आहे. मायकलने १५ मे २०१२ ला मॉडेल काईलीसह लग्न केले असताना त्यांना ४ वर्षाची एक मुलगीही आहे. मायकलने घटस्फोटाची माहिती देताना ‘काही वेळ एकत्र राहिल्यानंतर आम्ही वेगळे होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. आम्ही एक दुसऱ्याचा आदर करतो आणि असा निर्णय आहे की, आमची मुलगी तिच्या आईकडेच राहील’, असे त्याने म्हटले आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार मायकल आणि काईली यांचा घटस्फोट ४० मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलरमध्ये झाला असून काईली ही आपल्या मुलीसह वोक्लूज येथे राहणार आहे. २०१८ साली मायकलचे त्याच्या ऑफिस असिस्टंटसह विवाहबाह्य संबंध असल्याचे वृत्त होते. त्यांच्या या असिस्टंटचे नाव साशा आर्मस्ट्राँग असून ती त्यांच्या क्रिकेट अकॅडमीचे काम सांभाळते.
तसेच मायकल आणि साशा यांचे काही फोटो मीडियावर लीक झाले असून त्यात ते दोघे एका लक्जरी जहाजवर झोपलेले दिसून येत आहेत. फोटोमध्ये दोघेजण खूपच जवळ असल्याचे दिसत असून याच अफेयरमुळे मायकलने काईलीपासून घटस्फोट घेतला असल्याचे समजते. मायकलने ऑस्ट्रेलियाला २०१५ आयसीसी वर्ल्ड कप जिंकून दिला होता. तसेच टी-२० मध्येही ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पदावर असणारा पहिला कर्णधार आहे. त्यांचे वेगळे होणे धक्कादायक असून एक वर्षाआधी काईली आणि मायकल यांचे लग्न आणि नाते व अधिकच मजबूत झाले होते. त्यामुळे त्यांच्या वेगळ्या होण्याने अनेकांना धक्का बसला आहे.