MHADA Lottery | सर्वसामान्यांसाठी खूशखबर! ठाण्यातील हक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार, कधी निघणार जाहिरात? जाणून घ्या

मुंबई : MHADA Lottery | सामान्य माणसाचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा कमी किमतीत विक्रीसाठी घरांची जाहिरात करते. आता कोकण मंडळाकडून लवकरच एक नवीन लॉटरी काढली जाईल. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजने अंतर्गत दोन हजार घरांची सोडत काढण्याची तयारी सुरू आहे.
विशेष म्हणजे ही घरे मुंबई जवळ ठाणे, कल्याण, शीळ, विरार परिसरात असून, सर्वसामान्यांचे हक्काचे घर खरेदीचे स्वप्न साकार होणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या अखत्यारितील विक्रीवाचून रिक्त घरांची नव्याने लॉटरी काढण्यात येणार आहे. दोन हजार घरांच्या सोडतीसाठी तयारी सुरू असून, ऑगस्टमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, कोकण मंडळातील विरार- बोळींज, खोणी, शिरढोणसह अन्य ठिकाणच्या घरांची काही कारणांमुळे विक्री झाली नव्हती. त्यामुळे आता या घरांची विक्री ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत आणि ‘बुक माय होम’ संकल्पनेनुसार केली जात आहे. ‘बुक माय होम’ या योजनेस ३० एप्रिलपासून सुरुवात झाली आहे.