Mhada Exams Paper Leak Case | ‘म्हाडा’च्या पेपर फुटी प्रकरणानंतर कोचिंग क्लासेस पोलिसांच्या ‘रडार’वर (Video)

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Mhada Exams Paper Leak Case | आरोग्य विभागाच्या परीक्षेचे (Maharashtra Health Department) पेपर फुटल्याचे ताजे असतानाच रविवारी (दि.12) होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या (Mhada Exams Paper Leak Case) तयारीत असलेल्या आरोपींना पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन जण कोचिंग क्लासेसचे संचालक आणि मालक (coaching classes) असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काही कोचिंग क्लासेस चालवणारे पोलिसांच्या ‘रडार’वर आले (coaching classes in aurangabad) आहेत.
म्हाडा परीक्षेचे पेपर फोडण्याच्या तयारीत असताना पुणे सायबर पोलिसांनीऔरंगाबाद येथून तिघांना अटक केली आहे. यामध्ये टार्गेट करिअर पॉईंट (Target Career Point) या संस्थेचा संचालक अजय चव्हाण (Director Ajay Chavan) आणि सक्षम अकॅडमीचा (Saksham Academy) संचालक कृष्णा जाधव (Director Krishna Jadhav) तसेच त्यांचा साथिदार अंकित चनखोरे (Ankit Chankhore) यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणात अटक (Pune Crime) करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडे आज होणाऱ्या म्हाडा परीक्षेचे पेपर आणि विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्रांच्या प्रति मिळून आले आले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
असा फोडला जातो पेपर
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले, पेपर फोडून आर्थिक कमाई करुन घेण्यासाठी आरोपींना काही संस्थांची गरज असते. त्यामुळे आरोपी कोचिंग क्लासेस यांची मदत घेतात. कोचिंग क्लासेस आणि आरोपीचे संबंध असतात. कोचिंग क्लासेसचे मालक काही ठरावीक विद्यार्थ्यांना एका खोलीत किंवा ठरावीक ठिकाणी बोलावून घेऊन त्यांच्याकडून पेपर तोंडपाठ करुन घेतात. मात्र म्हाडा परीक्षेचा पेपर फोडण्यापूर्वीच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
लाखो रुपयांचा व्यवहार
म्हाडाकडून वेगवेगळ्या मोठ्या पदाच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या. त्यामुळे पदानुसार यामध्ये पैसे घेतले असल्याची शक्यता आहे. यात लाखोंचा व्यवहार झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडे चौकशी केल्यानंतर कोणत्या पदासाठी किती रक्कम घेतली गेली हे तपासात समोर येईल. परीक्षार्थी यांनी देखील पुढे येऊन यासंदर्भात माहिती द्यावी असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. तसेच विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
Web Title :- Mhada Exams Paper Leak Case | Coaching classes in aurangabad on police radar after MHADA Exams Paper Leak Case case
Comments are closed.