पुणे : बहुजननामा ऑनलाईन – प्रमुख लग्झरी कार कंपनी mercedes मर्सिडीज mercedes बेंज इंडिया (एमबीआय) ने आपले मेबॅक एस 600 मॉडेल आज भारतीय बाजारात सादर केले. या कारची किंमत पुणे शोरुममध्ये 2.60 कोटी रुपये आहे.
कंपनीने स्थानिक कारखान्यात असेम्बल केलेली मेबॅक एस 500 सुद्धा सादर केली, जिची किंमत 1.67 कोटी रुपये आहे.
या किमतीसह ती देशातच असेम्बल केलेली सर्वात महागडी कार बनली आहे. मर्सिडीज mercedes बेंज इंडियाचे मुख्य कार्यकारी एबरहार्ड कर्न यांनी येथे याबाबत घोषणा केली.
ते म्हणाले, कंपनी आता आठ मॉडेल स्थानिक स्तरावर असेम्बल करत आहे.
कर्न यांनी आपल्या ठिकाणी येणारे रोनाल्ड एस. फोल्ज यांची ओळख सुद्धा या कार्यक्रमामध्ये करून दिली. कर्न यांची बदली यूरोपला केली जाणार आहे.
कृपया हे देखील वाचा:
राज्यात 28 मेपर्यंत 5126 लोकांना म्युकरमायकोसिसची लागण
मालदिवला ‘या’ पध्दतीनं मदत करत भारताचा पाकिस्तानला मोठा दणका
जितेंद्र आव्हाडांचे सूचक ट्विट, म्हणाले – ‘…जो मरने के बाद भी सिस्टम को नंगा कर गई’