बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी यासाठी पशुसंवर्धन मंत्री यांच्यासोबत बैठक
वाघोली : बहुजननामा ऑनलाईन – बैलगाडा शर्यत बंदी उठविण्याबाबत आज राज्याचे पशुसंवर्धन मंत्री श्री. सुनील केदार यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राज्य सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे. तसेच मंत्रिमहोदय श्री. केदार साहेब महाधिवक्ता आशिष कुंभकोणी यांच्याशी चर्चा करून सर्वोच्च न्यायालयात लवकर सुनावणी व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहेत.लवकरच शेतकऱ्यांचा आवडीचा खेळ म्हणजेे बैलगाडा शर्यत हा चालूूू होईल का या कडे बैलगाडा मालक व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे या बैठकीला खासदार डॉ. अमोल कोल्हे, नरेंद्र पाटील, बैलगाडा संघटनेचे बाळासाहेब आरूटे, नितीन शेवाळे, धनाजी शिंदे, संदीप बोदगे, रामकृष्ण टाकळकर, अमोल हरपळे आणि पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. परकाळे, सहआयुक्त डॉ. प्रशांत भड, अवरसचिव डॉ. सं. श्री. पंचपोर, सहसचिव माणिक गुट्टे आदी उपस्थित होते.
Comments are closed.