‘PAK मध्ये जा’च्या विधानावर ओवैसी भडकले, म्हणाले – ‘गोळ्या संपतील पण आम्ही संपणार नाही’
बहुजननामा ऑनलाईन टीम – मेरठचे एसपी अखिलेश नारायण सिंह यांच्या ‘पाकिस्तानला जाण्याच्या’ विधानावरून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांना चांगलेच उत्तर दिले आहे. ओवैसी म्हणाले की,’लोकांनी तुमची वर्दी बघून तुम्हाला सोडून दिले. १८५७ मध्ये हिंदू-मुस्लिमांनी मिळून इंग्रजांना गोळ्या घातल्या होत्या. तुमच्या गोळ्या संपतील, पण आम्ही संपणार नाही. इथून पुढे कसलाही संकोच राहणार नाही. आम्ही कुठेही जाणार नाही.’
मेरठमधील सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा निषेध करणाऱ्यांना पाकिस्तामध्ये जाण्याचे संकेत दिले. त्यावरून ओवैसी आणि अखिलेश नारायण सिंह यांच्यात वाद पेटला. उत्तर प्रदेशचे उ.मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी मेरठच्या पोलीस अधीक्षकाचा बचाव केलामुळे केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी त्यांच्यावर लगेच कारवाई करण्याची मागणी केली.
उत्तर प्रदेशच्या भाजप नेत्यांद्वारे एसपी अखिलेश यांना वाचवल्यानंतर शनिवारी नकवी यांनी सांगितले की, ‘हे जर सत्य असेल तर ते निंदनीय आहे. अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई केली जावी.’ उमा भारती यांनीही सिंह यांचा बचाव केला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यानेही ते मेरठच्या एसपीसोबत असल्याचे सांगितले आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध करणाऱ्यांना मेरठच्या एसपीने पाकिस्तानमध्ये जाण्यास सांगितले. त्यांचे हे विधान कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले. त्यांनतर शनिवारी ते असे का म्हणाले याचा उलगडा करताना आंदोलक ‘पाकिस्तान जिंदाबाद’ चे नारे देत होते, म्हणून त्यांना तसे बोलावे लागले. असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी केलेल्या विधानावर मेरठमधील प्रमुख राजकीय पक्ष काँग्रेस, तसेच बहुजन समाज पार्टी आणि एमआयएमने आक्षेप घेतला आहे.
Comments are closed.