नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गौतम गंभीर फाऊंडेशन अनधिकृत प्रकारे फॅबीफ्लू औषधाचा साठा, खरेदी आणि वितरण करण्यात दोषी आढळले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास दिल्ली (Delhi) सरकारच्या ड्रग कंट्रोलरने केला. यानंतर ड्रग कंट्रोलरने गुरुवारी दिल्ली (Delhi) हायकोर्टमध्ये रिपोर्ट दाखल केला आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 29 जुलैला होईल.
ड्रग कंट्रोलरने म्हटले गौतम गंभीर फाऊंडेशन, ड्रग डिलर्ससोबत अशा बाबतीत उशीर न करता कारवाई करेल जे त्यांच्या निदर्शनास येतील.
हायकोर्टला ड्रग कंट्रोलरने सांगितले की, आप आमदार प्रवीण कुमार सुद्धा ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट अंतर्गत अशाच प्रकारच्या गुन्ह्यासाठी दोषी आढळले आहे.
दिल्ली हायकोर्टने ड्रग कंट्रोलरला सहा आठवड्यांच्या आत या प्रकरणात पुढील प्रगतीवर अहवाल दाखल करण्यास सांगितले आणि प्रकरण 29 जुलैला सुनावणीसाठी सूचीबद्ध केले.
काय आहे पूर्ण प्रकरण
दिल्ली हायकोर्ट त्या याचिकांवर सुनावणी करत आहे, ज्यामध्ये विविध नेत्यांद्वारे औषध, ऑक्सीजन आणि कोरोना उपचारासाठी आवश्यक वस्तूंची होर्डिंग करून आपआपल्या मतदार संघातील लोकांमध्ये वाटल्याबाबत तक्रार करण्यात आली होती.
अशा प्रकारे औषध आणि आवश्यक वस्तूंचा साठा कायदेशीर प्रकारे करता येऊ शकते नाही, हे बेकायदेशी आहे.
हायकोर्टने ड्रग कंट्रोलरला या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते, परंतु कंट्रोलरने खासदार आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीरला क्लीन चिट दिली.
भाजपा खासदार गौतम गंभीरला क्लीन चिट देण्यासाठी ड्रग कंट्रोलरला चांगलेच फटकारण्यात आले आणि कोर्टाने पुन्हा चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
हायकोर्टाने म्हटले तुम्ही चौकशी करूशकत नसाल तर तसे सांगा, आम्ही तुम्हाला हटवून इतर कुणाला तरी जबाबदारी देऊ.
तुम्ही सांगा की कोणत्या कायद्याच्या अंतर्गत याची परवानगी आहे, कशात नाही, ही औषधे इतक्या मोठ्या प्रमाणात मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे.
हे विचारत नाही की किती लोकांचा जीव वाचला.
कृपया हे देखील वाचा:
कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर शरीरात कमजोरी असेल तर करा ‘हे’ 7 उपचार; जाणून घ्या
6 महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेचा विहिरीत आढळला मृतदेह, माहेरच्यांनी केला घातपाताचा आरोप
शिक्षकांसाठी खुशखबर ! TET वैधतेबाबत महत्त्वाचा निर्णय, आयुष्यभर राहणार प्रमाणपत्राची वैधता
राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक, 18 जिल्हे पूर्णपणे Unlock; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती