बीड : बहुजननामा ऑनलाइन – MBBS Student Suicide | बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्याच्या देवदहिफळे येथील लातूरमध्ये MBBS चे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भागवत सुनील बडे (Bhagwat Sunil Bade) याने आत्महत्या (MBBS Student Suicide) केली. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. भागवत बडे हा लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात (Latur Medical College) MBBS च्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता.
भागवत बडे मंगळवारी (दि.30) गावाकडून लातूरला गेला होता. संध्याकाळी सहाच्या सुमारास त्याने हॉस्टेलच्या रुममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
लातूर येथील शासकीय रुग्णालयात त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात आले.
त्याचे वडिल सुनील बडे हे शेतकरी आहेत. अत्यंत हुशार आणि स्वभावाने मनमोकळा असलेल्या भागवतने टोकाचे पाऊल उचलल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
भागवत याची शासकीय कोट्यातून MBBS वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाली होती.
कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असून त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Web Title :- MBBS Student Suicide | beed medical student suicide in latur
हे देखील वाचा :
Pune ACB Trap | 2 हजाराची लाच घेताना पुण्यातील पोलीस कर्मचारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
SSY | व्याजदर वाढण्यापूर्वी सुकन्या समृद्धीमध्ये झाले 5 बदल, पैसे जमा करणार्यांनी जाणून घ्यावे