नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीचा अखेरच्या म्हणजे सातव्या टप्प्यातील मतदान बाकी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वच विरोधी पक्षांचे नेते तुटून पडले आहेत. त्यातच मायावती यांनी मोदींवर टीका केली होती त्यापार्श्वभूमीवर अरुण जेटली यांनी मायावती याना चांगलेच धारेवर धरले आहे .
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता मायावती यांनी पंतप्रधानांवर काल टीका केली होती त्यानंतर मायावतींच्या वक्तव्यांवरून ”त्या पंतप्रधानपदासाठी लायक नाहीत हेच स्पष्ट होतं ” असे जेटली यांनी केले आहे .
दरम्यान ,मायावती यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत पंतप्रधानांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. भाजपचे नेते, मंत्री, खासदार जेव्हा मोदींना भेटतात तेव्हा त्यांना भिती वाटते. मोदींनी जसं आपल्या पत्नीला सोडलं तसं आपले पती तर करणार नाहीत ना अशी भिती महिलांना वाटते असं मायावती यांनी म्हटलं होतं.
sabha-election-2019-mayawati-is-not-eligible-for-the-post-of-prime-minister-says-arun-jaitelyak
Behan Mayawati – She is firm on becoming a Prime Minister. Her governance, ethics and discourse stoops to an all-time low. Her personal attack today on the Prime Minister exposes her as unfit for public life.
— Arun Jaitley (@arunjaitley) May 13, 2019