नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करणारा आरोपी ऋषिकेश देवडीकर यास अखेर अटक करण्यात आली आहे. गौरी लंकेश हत्येचा तपास करणार्या एसआयटी पथकाला फरार असलेल्या 44 वर्षीय ऋषिकेशला अटक करण्यात यश आले आहे. एसआयटीने ऋषिकेशला झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातील कतरास येथून अटक केली.
आज कोर्टात हजर करणार
हत्येचे काही धागेदोरे आणि पुरावे मिळविण्यासाठी त्याच्या घराची झडती घेतली जात आहे. त्यास आज न्यायदंडाधिकार्यांसमोर हजर केले जाणार आहे. ऋषिकेश हा गौरी लंकेश यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार आहे. गौरी लंकेश यांची हत्या 5 सप्टेंबर 2017 रोजी बेंगळुरू येथे झाली होती.
ओळख लपवून रहात होता आरोपी
मिळालेल्या माहितीनुसार गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपी ऋषिकेश कतरासमधील व्यापारी प्रदीप खेमका यांच्या पेट्रोल पंपामध्ये ओळख लपवून रहात होता. त्यास बेंगळुरूच्या एसआयटीने छापा मारून पकडले.
एसआयटी पथकाचा सन्मान
गौरी लंकेश खून प्रकरणाचा तपास करणार्या पथकाच्या गौरवास्पद कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने या पथकाला मागील वर्षी मेडल प्रदान केले होते. बेंगळुरूमध्ये तपास अधिकारी आयपीएस एम एन अनुचेथ, डेप्युटी एसपी रंगप्पा आणि इन्स्पेक्टर राजा यांना केंद्र सरकारने त्यांच्या तपासासाठी केंद्रीय गृहमंत्री पदकाने सन्मानित केले होते.कर्नाटक सरकारने सुद्धा गौरी लंकेश तपासाशी संबंधित एसआयटीला 25 लखांचे बक्षीस दिले होते. राज्य सरकारनेच या अधिकार्यांना सन्मानित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाला शिफारस केली होती.
Visit : bahujannama.com