नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपला १६ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या कॅलिफोर्नियातील एका तरुणाने आपल्या शाळेतील मित्रांवर हल्ला केला. व तसेच सेमी ऑटोमॅटिक पिस्तोलने दोघांचाही जीव घेतला. या हल्ल्यामध्ये अन्य दोन मुलीसुद्धा जखमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे यानंतर हल्ला करणाऱ्या मुलाने स्वतःला देखील गोळी मारून घेतली आहे. त्यामुळे जखमी झालेल्या तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्थानिक अहवालानुसार, हल्लेखोर आशियातील मूळचा असू शकतो. लॉस एंजेलिसच्या उत्तरेस 65 कि.मी. अंतरावर असलेल्या सांता क्लारिता मधील सौगुस हाई स्कूलमध्ये सकाळी अचानक झालेल्या फायरींगमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. सूचना मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल करण्यात आलेल्यांपैकी दोघांची हालत अत्यंत गंभीर आहे. यामध्ये आधीच दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे.
स्थानिक माहितीनुसार हल्लेखोराच्या वडिलांचा २०१७ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता, त्यानंतर तो अस्वस्थ झाला. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या दोघांचे वय १४ आणि १६ वर्ष इतके होते. नैथेनील बेरहोव असे हल्लेखोराचे नाव आहे ज्याने स्वतः देखील गोळी मारून घेतली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी शाळा बंद केली आणि या बाबतचा अधिक तपास सुरु केला आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बेरहोव हा अत्यंत लाजाळू आणि शांत स्वभावाचा मुलगा होता तसेच त्याच्या वडिलांना दारूचे व्यसन लागले होते त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.
Visit : bahujannama.com