Maruti Chitampalli Passes Away | महाराष्ट्राचा ‘अरण्यऋषी’ हरपला! पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे निधन

Maruti Chitampalli Passes Away | Maharashtra's 'Aranyarishi' passes away! Padma Shri Maruti Chitampalli passes away
June 19, 2025

सोलापूर : Maruti Chitampalli Passes Away | पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेले अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी मारुती चितमपल्ली यांनी अखेरचा श्वास घेतला. ३० एप्रिल २०२५ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. पुरस्कार सोहळ्यानंतर दिल्लीतून परतल्यापासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ते आजारी आणि अंथरुणातच होते. बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास सोलापुरातील राहत्या घरी त्यांचे निधन झाले.

मारुती चितमपल्ली यांनी वन खात्यात ३६ वर्षे सेवा केली. त्या काळात देशभर संशोधकवृत्तीने भटकंती केली. त्यांनी एकूण पाच लाख किमी प्रवास केला. मारुती चितमपल्ली यांना १३ भाषांचे ज्ञान होते. त्याद्वारे आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत त्यांनी पर्यावरणाशी संबंधित मोठी माहिती मिळवली. त्या माहितीची नोंद केलेल्या आणि ३० वर्षे जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या आहेत. डायरीतील नोंदीला शास्त्रीय आधार देत पक्षीकोश, प्राणीकोश आणि मत्स्यकोशाचे लेखन पूर्ण केले. अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्य जीवन विषद करणारी २५ पेक्षा जास्त पुस्तके चितमपल्ली यांनी लिहिली.

मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी म्हणाले की, मराठी साहित्यात निसर्ग चित्रणाची वाट मारुती चितमपल्ली यांनी निर्माण केली. त्यांचे संबंध लेखक वाचत असताना आपण रानातून वनातून जंगलातून फिरतो, पशु पक्षी प्राणी आपल्याशी संवाद साधतात, असा आपल्याला भास होत होता. अतिशय ललितरण्य अशी त्यांची शैली होती. म्हणजे अभ्यास आणि व्यासंगाला शैलीची जोड देऊन त्यांनी जे काही लेखन केले. त्यामुळे मराठीत एक वेगळी हिरवी वाट त्यांच्या लेखन आणि निर्माण झाली. त्यांच्या निधनाची अतिशय दुःखद बातमी आहे.