नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या जम्मू-काश्मीरमध्ये हिमवादळ चालू असून त्यात लष्कराचे तीन सैनिक शाहिद झाले असून त्यातील एकजण गुरुदासपूरच्या सिद्धपूर नवव्या गावचा होता. या जवानाचे लग्न एक वर्षांपूर्वी झाले होते. दोन महिन्यांपूर्वी त्याला एक बाळ झाले असून त्याचा चेहरा न पाहताच हा जवान शहिद झाल्याची दुःखद घटना घडली आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे माछिल-उरी सेक्टरमध्ये हा शहिद झालेल्या या जवानाचे वय अवघे २६ वर्ष होते. तो ४५ व्या राष्ट्रीय रायफल्समध्ये शिपाई म्हणून कार्यरत होता.
या शहीद जवानाचे नाव रणजितसिंह असून मागच्या २६ जानेवारी २०१९ रोजी त्याचे लग्न झाले होते. डिसेंबरमध्ये त्याच्या घरी परी नावाच्या मुलीचा जन्म झाला. परंतु जम्मू-काश्मीरमधील होणाऱ्या हिमवादळामध्ये त्याचा जीव जाऊन तो शहीद झाला, त्यामुळे त्याला आपल्या मुलीचा चेहराही बघता आला नाही.
शहीद जवानाचे वडील हरबन्स सिंग यांनी प्रतिक्रिया देत त्यांचा दुसरा मुलगा मतिमंद असून रणजितसिंहच त्यांचा एकमेव आधार असल्याचे सांगितले.