बहुजननामा ऑनलाईन टीम – मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेत सीएम योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत विवाहितेने विवाह अनुदानाच्या लालसेने पहिल्या पतीचा विश्वासघात करत नंतर प्रियकरासोबत लग्न केले. पहिल्या पतीच्या आईने अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर समाज कल्याण अधिकारीने पंचायत कल्याणपूर ब्रिजेश कुमार यांना त्वरित पदभार काढून मुख्यालयाशी संलग्न केले. सीडीओने याप्रकरणी एफआयआरचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत १४ नोव्हेंबर रोजी बिलसंडा ब्लॉकमध्ये ५२५ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यात स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विवाहित जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी आले होते. सुशीला देवी नावाच्या महिलेनेही सामूहिक विवाहात आपल्या प्रियकरासोबत विवाह केला.
पीलीभीत येथील सिविल लाइंस रहिवासी मोहितसोबत या महिलेचे लग्न झाले आहे. या नवऱ्याची आई शांती देवी यांनी अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत सांगितले कि, सामूहिक विवाहात भाग घेणाऱ्या सुशीला देवीने सहा महिन्यांपूर्वी आपल्या मुलासह लग्न केले होते. तिने मुलाचा विश्वासघात करून प्रियकराशी लग्न केले आहे. लग्नासाठी नाव, पत्ता आणि इतर नोंदी त्याच्या मुलाच्या लावलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तिच्या माहेरच्यांनीं तिला घरी नेले होते. तेथूनच ती सामूहिक विवाहात सामील झाली.
दरम्यान ५१ हजार रुपये घेण्याच्या उद्देशाने तिने आपल्या मुलाचा विश्वासघात केला आहे. १४ नोव्हेंबरला सीएम योगी नूरपूर गावात व्यासपीठावरून भाषण देत होते, दुसरीकडे, मंदिराजवळ ५२५ जोडप्याचा विवाह सोहळा सुरु होता. मुख्यमंत्र्यांनाही वधू-वरांनी एकत्रितपणे आशीर्वाद दिला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामूहिक विवाहातील फसवणूकीच्या प्रकरणानंतर अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. डीएमने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. बीडीओ लिलौरीखेडाला या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.