बहुजननामा ऑनलाईन टीम – अमेरिकेच्या टेक्सासमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन विद्यार्थ्यांसह शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल एका ३३ वर्षीय महिला शिक्षिकेला दोषी ठरविण्यात आले, परंतु तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली नाही. दोन मुलांची आई असणाऱ्या विवाहित महिला शिक्षकाने १६ आणि १८ वर्षांच्या दोन विद्यार्थ्यांशी संबंध बनवले होते.
प्रॉसेक्यूटरसोबत केलेल्या प्ली डील (कबुलीजबाबातील करार) नंतर शिक्षक लिन बुर्ज यांना तुरूंगात शिक्षा सुनावण्यात आली नाही. पण तिच्यावर ५ वर्ष पाळत ठेवण्यात येणार आहे. तिच्यावर गुन्हा म्हणून १.७ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, झालेल्या पेआकारणानंतर लिनला ५० वर्षांपर्यंत तुरूंगवासही भोगावा लागू शकतो.
दरम्यान, लिन बुर्ज टेक्सासच्या कुक काउंटी येथील मुन्स्टर हायस्कूलमध्ये शिक्षिका म्ह्णून कार्यरत आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांना टिचिंग लायसेन्सदेखील जमा करावा लागणार आहे. परंतु, लैंगिक गुन्हेगारांच्या यादीत त्याचे नाव लिहिले जाणार नाही. लिनने विद्यार्थ्यांशी ‘अनैतिक संबंध’ असलेल्या २ घटनांची कबुली दिली. लिनवर १६ वर्षाच्या मुलावर स्नॅपचॅटवर नग्न फोटो पाठविल्याचा देखील आरोप होता. लिनने संबंधित मुलाला त्याच्या घरी बोलावले. पोलिस चौकशीत मुलाने सांगितले की, लिनचे कुटुंबातील सदस्य त्या दिवशी घरी नव्हते.
लिनचे वकील रिक हेगेन यांनी माध्यमांना सांगितले- ‘लिनने सुरुवातीपासूनच आपल्या चुकांची कबुली दिली आहे. तिच्या चुकांमुळे तिची परिभाषा करता येत नाही. त्याऐवजी चुकांवर त्यांनी कशी प्रतिक्रिया दिली हे पहावे लागेल. त्याचा प्रतिसाद अगदी बरोबर होता.