बहुजननामा ऑनलाईन : क्रिमिनल डिफेन्स वकील असणाऱ्या महिलेने एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, ती अर्धवेळ वेश्याव्यवसायाचे काम करते. अमेरिकेच्या आयोवा येथील रहिवासी असलेल्या कॅथरीन सीअर्सने आशा व्यक्त केली आहे की, तिची कहाणी उलगडत गेल्याने लैंगिक कामांना गुन्हेगारीच्या श्रेणीतून बाहेर काढण्यात मदत होईल. कॅथरीन या एका मुलाच्या आई देखील आहेत. कॅथरीन म्हणाल्या की, नेवाड्यातील एका वेश्यागृहात तिने केवळ 3 आठवड्यांत 40 लाख रुपये कमावले. त्यांनी सुमारे 3 वर्षांपूर्वी अर्धवेळ वेश्या व्यवसायाचे काम सुरू केले.
दरम्यान, अमेरिकेतील नेवाडा येथे लैंगिक कार्य कायदेशीर आहे. तसेच कॅथरिन यांनी सांगितले कि, तिच्या नवऱ्याला तिच्या या कामाबाबत कोणतीही अडचण नाही. कॅथरीन यांनी ४ महिन्यांपूर्वीच मुलाला जन्म दिला आहे. मुलाच्या जन्मानंतर कॅथरीनने काही काळ वेश्या व्यवसायाची नोकरी सोडली. कॅथरीन म्हणतात की, आपण लैंगिक कामाबद्दल जितके जास्त बोलतो तितकेच ते गुन्हेगारीच्या श्रेणीतून वगळले जाण्याची शक्यता असते.
जर आपण याबद्दल बोललो नाही तर कायदा बदलला जाऊ शकत नाही आणि आपला दृष्टिकोनदेखील. पत्नीच्या वेश्या व्यवसायाच्या कामाबद्दल पती जॉन यांनी म्हंटले की, त्याला त्याबद्दल फारशी काळजी नाही. त्याचबरोबर लैंगिक कामाबद्दलच्या गैरसमज आणि पूर्वग्रहांविरूद्ध मला काम करत राहावेसे वाटते, असेही कॅथरीन यांचे म्हणणे आहे.