बहुजननामा ऑनलाइन – वलसाड जिल्ह्याच्या उमरगाम शहरातील गांधीवाडी सोसायटीत(Married girlfriend) एका प्रियकराने फ्लॅटच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. हा तरूण विवाहित प्रेयसीला(Married girlfriend) भेटण्यासाठी तिच्या फ्लॅटमध्ये गेला होता, परंतु याच दरम्यान प्रेयसीचा पती आला आणि घाबरलेल्या प्रियकराने उडी मारली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक लोकांनीच घटनेची माहिती पोलिसांना दिली.
कुटुंबाने केला हत्येचा आरोप
पोलिसांनुसार, मृताचे नाव राजूभाई दूबला आहे. जेव्हा त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यात आला तेव्हा माहिती मिळाली की, मागील काही काळापासून राजूचे गांधीवाडी सोसायटीत राहणार्या विवाहित महिलेशी संबंध होते. विवाहितेला दोन मुलेसुद्धा आहेत. राजू नेहमी तिला भेटण्यासाठी जात होता. शुक्रवारी सायंकाळी सुद्धा प्रेयसीने फोन करून त्याला बोलावून घेतले होते. राजूच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, प्रेयसीच्या पतीने त्याची हत्या केली आहे. तर, प्रेयसी यास अपघात असल्याचे सांगत आहे. सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
नोकरीच्या दरम्यान ओळख
राजूच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले की, दोघांचे प्रेमसंबंध मागील दोन वर्षांपासून सुरू होते. दोघांची भेट नोकरीच्या दरम्यान झाली होती. काही मित्रांनी सांगितले की, प्रेयसीच्या पतीला दोघांच्या अवैध संबंधांचा संशय आला होता.
प्रेयसीने खाली येऊन मृतदेह पाहिला
जेव्हा राजू फ्लॅटमधून खाली पडला, तेव्हा त्यास कुणीही पाहिले नाही. जेव्हा घटनास्थळी स्थानिक लोक जमा झाले, तेव्हा प्रेयसी फ्लॅटमधून खाली आली होती आणि त्याचा मृतदेह पाहून परत गेली होती. संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर आणि प्रेयसीचे नाव समोर आल्यानंतर स्थानिक लोकांनी ही माहिती दिली.