बहुजननामा ऑनलाईन टीम : शिक्षिका आणि विद्यार्थांचे गुरु शिष्याचे नाते असते. त्यामुळे विद्यार्थी त्यांचा आदर करतात. शिक्षकही आपल्या विद्यार्थांशी आदराने राहतात. हे विद्यार्थांना योग्य मार्ग दाखवतात. जर शिक्षिकांनी आपल्या मर्यादा ओलांडल्या तर त्यांना काहीच किंमत राहत नाही. एका शिक्षिकेने आपल्या मर्यादा पुर्णपणे ओलांडल्या आहेत. तिने चक्क पाच विद्यार्थांशी संबंध ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे या शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या सहमतीने संबंध ठेवल्याचे ही समजले आहे.
एका विशिष्ट एलिट कॉलेजमध्ये शिकविणारी विवाहित महिला शिक्षकेचे कमीतकमी 5 विद्यार्थ्यांशी शारीरिक संबंध होते. महाविद्यालयाने केलेल्या तपासणीत हे उघड झाले आहे. ही बाब दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनची आहे. एज्युकेशन काउंसिलने बनवलेल्या कोड ऑफ एथिक्सला तोडल्यामुळे या शिक्षिकेच्या शिकवण्यावर बंदी लागू शकते.
30 वर्षीय फियाना विओटी नावाची शिक्षिका मॉडेल देखील आहे. ती बिशॉप डायओसेसन महाविद्यालयात शिकवत होती. ती कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तिच्या घरी बोलावत असे.
२०१३ ते २०१९ दरम्यान फिओना यांचे विद्यार्थ्यांशी संबंध असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्याने त्या शिक्षिकेने महाविद्यालयातून राजीनामा दिला आहे. प्रथम 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने दावा केला की त्याचे फिओनाशी शारीरिक संबंध आहेत. जेव्हा त्याने हे संबंध संपवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा फियोनाने नकार दिला आणि पुढे जाण्यासाठी दबाव आणला. त्यानंतर विद्यार्थ्याने पालकांना याची माहिती दिली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतरच महाविद्यालयाने तपासणी केली.
संशोधकांना समजले की, फिओना ही नुकत्याच वयात आलेल्या विद्यार्थ्यांना टार्गेट करत होती. फियोनाने विद्यार्थ्यांसोबत सुमारे 6 वर्षे संबंध ठेवले. विद्यार्थ्यांशी सहमतीने संबंध असूनही फिओनावर कारवाई केली जाऊ शकते. कारण फिओना एका चांगल्या पदावर होती आणि तिने महाविद्यालयाचे नियम देखील मोडले आहे. यामुळे, ती आता कधीही मुलांना शिकवू शकणार नाही.
मिळालेल्या माहितीनूसार, फिओनाने 2018 मध्ये 32 वर्षीय वेंचर कैपिटलिस्ट पाओ विओटीशा लग्न केले होते. तिचे लग्नाच्या आधी आणि नंतर फिओनाचे विद्यार्थ्यांशी संबंध होते.
फियोनाने स्वतःचा एक इंटिमेट व्हिडिओही रेकॉर्ड केला होता जो महाविद्यालयात व्हायरल झाला होता. पण अद्याप हे समजू शकले नाही फिओनाने प्रथम व्हिडिओ कोणाला पाठविला आहे. महाविद्यालयीन कर्मचार्यांना या प्रकरणाची माहिती होती असे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. विद्यार्थ्यांच्या कुटूंबाच्या वतीने फिओनाविरूद्धदेखील खटला दाखल होऊ शकतो. त्याचवेळी एका वकिलाने सांगितले की, फिओना मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेत आहे. त्याचबरोबर असे म्हटले जात आहे की, फिओनाचा नवरा तिच्यापासून विभक्त झाला आहे. महाविद्यालयातर्फे प्रभावित विद्यार्थ्यांना मानसोपचार तज्ञाची मदत घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Visit : bahujannama.com