Market Yard Pune Crime News | बहुजन शक्ती सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब रणदिवे यांच्या हत्ये प्रकरणी चौघांना अटक

पुणे : Market Yard Pune Crime News | व्हॉटसअ‍ॅपवर पाठवलेल्या मेसेजमुळे चिडून कोयत्याने वार करुन बहुजन शक्ती सेनेचे (Bahujan Sakti Sena) अध्यक्ष बाळासाहेब रणदिवे (Balasaheb Randive) यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

राहुल दत्तात्रय खुडे (वय ४०), सचिन दत्तात्रय खुडे (वय ३८), सुरजसिंग दिलीप सिंग दुधानी (वय २८, तिघेही रा. गुलटेकडी), हनुमंत लकप्पा कांबळे (वय ३०, रा. येवलेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब रणदिवे हे मित्रासमवेत बुधवारी रात्री ९ वाजता माकेटयार्ड येथील येवले चहाच्या समोर चहा पित होते. यावेळी आरोपी तेथे आले. बाळासाहेब रणदिवे यांनी व्हॉटसअ‍ॅपवर पाठविलेल्या मेसेजमुळे चिडून जाऊन त्यांनी हातातील स्टिलचे हत्याराने दहशत निर्माण केली. बाळासाहेब रणदिवे यांच्यावर कोयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी करुन ते पळून गेले. रणदिवे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी चौघा हल्लेखोरांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक राहुल खिलारे (PI Rahul Khilare) तपास करीत आहेत.