मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारे नागेश भोसले (Marathi Actor Nagesh Bhosle) सर्वांचं परिचित आहेत. त्यांची देवयानी (Devyani) या मालिकेत साकारलेली आबासाहेबांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. बॉडीबिल्डिंग (Bodybuilding) क्षेत्रात महिलांचा सहभाग खूप कमी दिसतो. मात्र याच क्षेत्रात नागेश भोसले (Marathi Actor) यांची मुलगी नाव कमावत आहेत. विशेष म्हणजे मुलीच्या या निर्णयाला या अभिनेत्यानेही पाठींबा दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नागेश भोसले त्यांची मुलगी कुहू भोसले (Kuhu Bhosle) हिने वयाच्या वयाच्या 17 व्या वर्षीच या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला होता. आज या क्षेत्रात ती चांगली कामगिरी करतेय. एका मुलाखती दरम्यान नागेश भोसले यांनी आपल्या मुलीने निवडलेल्या करियर संदर्भात बोलताना म्हणाले की, मुलांच्या त्यांच्या आवडीनुसार करिअरसाठी क्षेत्र निवडण्याचा अधिकार आहे. माझ्या मुलीने घेतलेल्या निर्णयाचा मला आनंद आहे. तिच्यावर मी कधीही दबाव टाकला नाही.
कुहू फिटनेस प्रशिक्षक (Fitness instructor) तर आहेच, पण त्यासोबतच ती अँथलेटसुद्धा (Athlete) आहे. ऐमचर ऑलंपियामध्ये (Amateur Olympia) कुहूने कांस्य पदक पटकावलं होतं. परदेशातील अनेक महिला या क्षेत्रात आहे. परंतु भारतात हे प्रमाण खूप कमी आहे. याबाबत बोलताना कुहू म्हणाली की, मला करिअर निवडण्याचं माझ्या आईवडिलांनी स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे मीसुद्धा न घाबरता या क्षेत्रात उतरले.
Web Title :- marathi actor | marathi actor nagesh bhosle daughter kuhu bhosle story as a body builder
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Delta Plus Variant | राज्यात डेल्टा प्लसचा धोका वाढला; बीडमध्येही आढळला रुग्ण
MP Sanjay Jadhav | शिवसेना खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले – ‘राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू’