बहुजननामा ऑनलाईन – अल्पवयीने मुलील बिकीनीत फोटोशूट करायला लावल्याने नाट्यकर्मी मंदार कुलकर्णी याला पोलीसांनी अटक केली आहे. कुलर्णीने तिला जबरदस्तीने बिकीनीत फोटोशुट करायला लावले असा आरोप तिने यावेळी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाटकात काम करण्यासाठी ही तरुणी पुण्यात आली होती. ऑडिशनसाठी फोटोशुट कराव लागेल, असे सांगून त्याने तरुणीला बोलवून घेतल. सुरवातीला वनपीस मध्ये फोटोशुट करुन घेतले. त्यानंतर कुलकर्णीने संबंधित तरुणीला बिकीनीत फोटोशुट करायला सांगितले. तिने बिकीनीत फोटोशुट करण्यास विरोध करुनही त्याने जबरदस्तीने तिच्याकडून फोटोशूट करुन घेतले.
मंदार कुलकर्णीने तिला कपडे काढायला सांगून पाठीचे उघडे फोटो जबरदस्तीने काढून घेतले. यानंतर ती कपडे घालत असनाच आरोपीने मला बोलवून कपड्याचे माप घेतले. शेवटी माझ्याकडून असे फोटोशूट करून घेतल्याच घरी सांगू नकोस,’ अशी तक्रारही पीडित तरुणीने दाखल केली आहे.