नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मराठा आरक्षणाची सुनावणी आज (शुक्रवार) सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे पार पडली आहे. पुढील सुनावणीही 8 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सर्व याचिकाकर्त्यांनी मराठा आरक्षणाची सुनावणी ही समोरासमोर व्हावी अशी मागणी केली होती.
Maratha Reservation: Hearing commences before Constitution Bench.
Mukul Rohatgi tells court volumes of documents are being printed and it will take 2 weeks. Rohatgi asks court to fix the matter in 1st week of March to fix a date considering physical hearing might commence then. pic.twitter.com/j6mPxGIT2z
— Bar & Bench (@barandbench) February 5, 2021
न्यायमूर्ती अशोक भुषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेशवर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रविंद्र भट तसेच न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश असलेले घटनापीठापुढे आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची सुनावणी झाली.
मराठा आरक्षणाची सुनावणी ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेऊ नये. जी सुनावणी होणार आहे ती समोरासमोर व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे न्यायमूर्तींनी या प्रकरणावर पुढील सुनावणी 8 मार्च रोजी घेण्याचा आदेश दिला आहे. पुढील सुनावणीही सर्व याचिकाकर्त्यांच्या उपस्थितीत समोरासमोर होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील मुकूल रोहतगी यांनी कोर्टात सुनावणीदरम्यान सांगितलं की, दस्तऐवजांच्या खंडांच्या प्रिंट काढायच्या असून त्यासाठी किमान दोन आठवडे लागणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष सुनावणी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु करण्याची विनंती सुप्रीम कोर्टाकडे त्यांनी केली होती.