Maratha Reservation | मराठा आरक्षण ! आरक्षण नाही, शिक्षणाचा खर्च घरच्यांना पेलवणार नाही, मराठा तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

Shivani Sanjay Hiwale

जालना : Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी होम ग्राउंडवर म्हणजेच जालन्यात शुक्रवारी मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढली. दरम्यान काही मराठा तरुणांनी सरकार आरक्षणाची मागणी मान्य करत नसल्याने नैराश्याच्या भरात आत्महत्या केल्याची घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना भोकरदन (Bhokardan) तालुक्यात घडली आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणासाठी लागणारा खर्च पेलु शकत नसल्याने एका तरुणीने आत्महत्या केली.

भोकरदन तालुक्यातील देऊळगाव ताड येथील शिवानी संजय हिवाळे Shivani Sanjay Hiwale (वय-18) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तीला बारावीला 72 टक्के मार्क मिळाले होते. मात्र, घरची परिस्थीती हालाखीची असल्याने आणि पुढील शिक्षणासाठी लागणारा खर्च पेलु शकत नसल्याने तसेच मराठा आरक्षण असते तर खर्च कमी लागला असता. या विवंचनेत तीने एक चिठ्ठी लिहुन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी देऊळगाव ताड येथे घडली.

शिवानीचे आत्तापर्य़ंतचे शिक्षण हे तिच्या मामाने केले होते. यापुढे तिला खुप शिकण्याची इच्छा होती. तिला बी.ए.च्या प्रथम वर्षाला प्रवेश ही घ्यायचा होता. परंतु हालाखीची परिस्थिती असल्याने त्यात मराठा आरक्षण ही नाही. या विचारात तीने चिठ्ठी लिहून आपल्या भावना व्यक्त करुन विहिरीत उडी घेऊन जीवन यात्रा संपवली.