मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्याचे आरोग्य मंत्री (State Health Minister) आणि शिंदे गटाचे नेते (Shinde Group) तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी उस्मानाबाद येथे भाषण करताना मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील वातावरण आणखी तापण्याची चिन्ह आहेत. तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात बोलाताना, दोनवेळा आरक्षण गेल्यानंतर मराठा समाज गप्प राहिला. पण आता राज्यात सत्तांतर होताच तुम्हाला लगेच मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) खाज सुटली, असे वक्तव्य सावंत यांनी केले. यामुळे मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) आक्रमक झाला असून त्यांनी सावंत यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तानाजी सावंत यांनी मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) घेतलेल्या भूमिकेबाबत बोलताना तारतम्य बाळगावे. तुम्ही भाषणात काय बोलत आहात? तुम्हाला काहीतरी भान राहिले आहे का? जर तुम्हाला उघड समाजाच्या भूमिके सोबत येणे शक्य नसेल, तर कमीत कमी विरोध तरी करु नका. तरी आपण जी समाज विरोधी भूमिका घेतली त्याबद्दल समाजाची माफी मागा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार (Coordinator Yogesh Kedar) यांनी केली आहे.
योगेश केदार पुढे म्हणाले, आम्ही सामन्य मराठे काही कुणी तुमच्या विरोधकांनी सोडलेली पिलावळ नाहीत. मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण (Maratha Reservation) ही भूमिका कुणाही विरोधी पक्षाच्या सांगण्यावरुन घेतली नाही. हे तुमचे सरकार आले म्हणून आम्ही आंदोलने (Agitations) सुरु केली असे बिन बुडाचे आरोप करुन नका. तसेच तुम्हाला नेमकं काय वाटतंय की समाज काहीही बोलले तर सहन करेल? सत्तीची हाव एवढी पण डोक्यात जाऊ देऊ नका. आणि हो एससी मधून आरक्षण द्या अशी भूमिका मराठा समाजाने कधीच घेतली नाही आणि भविष्यात घेणार देखील नाही. त्यामुळे असे काही बोलून पत घालवून घेऊ नका.
ज्यावेळी तुम्ही मुळ पक्ष सोडून गुवाहाटीला पळून गेले तेव्हा हाच सर्वसामान्य मराठा तुमच्या बाजूने उभा होता.
म्हणून तुम्ही परत आल्यावर सुखासुखी नवीन सरकार स्थापन करु शकला. आजही तुम्ही सभा घेऊ शकत आहात.
जर गाव गाड्यातला अन् महाराष्ट्रातला सामान्य मराठा तुमच्या विरोधात गेला असता तर तुम्हाला कुणी जगू देखील
दिलं नसतं. आज शेवटचे सांगणे आहे, तुम्हाला जर एखाद्या विषयात काही माहिती नसेल तर बोलू नका,
असेही तानाजी सावंत यांना मराठा क्रांती मोर्चाकडून बजावण्यात आले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Maratha Reservation | maratha kranti morcha warns tanaji sawant over controversial statement about maratha reservation
हे देखील वाचा :
Crack Heels Remedies | घरीच बर्या करू शकता भेगा पडलेल्या टाचा, ‘या’ आहेत पद्धती
Diabetes | डायबिटीजचा धोका ‘या’ 6 लोकांना जास्त, तुमचा सुद्धा यामध्ये समावेश नाही ना?