बहुजनामा ऑनलाईन – आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युतीने आम्हाला जर सन्मानाने १० जागा दिल्या तर आम्ही त्यांच्या सोबत जावू अन्यथा आम्ही राज्यात १०० जागा लढवू असा धमकी वजा इशारा मराठा क्रांती सेनेचे पक्ष प्रमुख सुरेश पाटील यांनी युतीला दिला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा क्रांती सेना निवडणुकीच्या रिंगणात उतणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान सर्वच पक्ष आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागलेले दिसून येत आहेत. त्यातच मराठा क्रांती सेना ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा केली जात आहे. त्यासाठी युतीने आम्हाला १० जागा देण्याची मागणी मराठा क्रांती सेनेनं केली आहे.
या पार्श्वभूमीवर येत्या १६ ऑगस्टपासून विधानसभा निवडणुकीच्या राज्यातील १०० जागांसाठी मुलाखती घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. परंतु, तरीही युतीने आम्हाला सन्मानाने बोलावून जर १० जागा दिल्या तर आम्ही त्यांच्या सोबत जावू अशी तयारी ही मराठा क्रांती सेनेने दाखवली आहे.अन्यथा आम्ही १०० जागा लढवू असे पक्षप्रमुख सुरेश पाटील यांनी सांगितले.