अमृतसर : वृत्तसंस्था – अनेकदा अशा घटना समोर आल्या आहेत. ज्या वाचल्यानंतर असं वाटतं की, आजच्या जगात नात्याला काहीच किंमत नाही. दिवसेंदिवस लोक नात्याच्या मर्यादा ओलांडत आहेत. आज आपण अशाच घटनेची माहिती घेणार आहोत. जे वाचून तुम्हाला धक्का बसेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पंजाबमधील अमृतसरमधील आहे. एका आईने लाज वाटेल असं काम केलं आहे. चकित करणारी बाब अशी की, पैशांच्या लालसेपोटी तिने आपल्या मुलीला आपल्या प्रियकारसोबत खोलीत बंद केले. इतकेच नाही तर तिला संबंध ठेवायलाही सांगितलं.
या घटनेनंतर मुलीने लोकांना एकत्र करत मोर्चा काढला होता. आरोपींच्या तावडीतून सुटका करत ती पोलीस ठाण्यात पोचली होती. तिथे तिने पोलिसांना सांगितले होते की, तिची आई अनु घरीच देहविक्रीचा व्यापार करते. मुलीने सांगितले की, ती ग्राहकांकडे मुली घेऊन जाते. ती असेही बोलली की, आईने तिलाही इतरांकडे सोपवले आहे. पुढे ती म्हणाली की, मनीषने आईला 6 हजार रुपये देत म्हटले की, एका रात्री साठी तुझी मुलगी हवी आहे.
मुलीच्या आईने पैशांसाठी तिला मनिषच्या हवाली केलं होतं. मुलीने काही करण्यास नकार दिल्याने तिला जबरदस्तीने सोबत नेण्यात आले आणि खोलीत नेऊन जबरदस्तीने संबंध ठेवण्यात आले. यानंतर तिला कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.